Kangana Ranaut ला चंदीगड जिल्हा न्यायालयाची नोटीस; Emergency विरोधात याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश
कंगना राणौतला चंदीगड जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिचा चित्रपट इमर्जन्सीविरोधात दाखल याचिकेवर मंगळवारी सुनावणी करताना न्यायालयाने नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Chandigarh Court Notice To Kangana Ranaut: इमर्जन्सी चित्रपटामुळे(Emergency Controversy) दिवसेंदिवस च्या (Kangana Ranaut)अडचणी वाढत आहेत. चंदीगड जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वकिल रविंदर सिंग बस्सी यांनी कंगना विरोधात एफआयआर नोंदवण्याची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आता या याचिकेवर सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच कंगणाला चंदीगड जिल्हा न्यायालयाची(Chandigarh Court) नोटीस बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये कंगनाला 5 डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Kangana Ranaut Mumbai Bungalow: कंगना राणौतला तिचा मुंबईतील बंगला अवघ्या 32 कोटींना विकला, जाणून घ्या, काय आहे कारण)
अधिवक्ता रविंदर सिंग बस्सी म्हणाले की, कंगनाने या चित्रपटाद्वारे शीखांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाने इतिहास न वाचता शीखांची नकारात्मक प्रतिमा दाखवली असून खोटे आरोपही केले आहेत. त्यामुळे त्यांनी कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत कंगना राणौतसह स्क्रीन प्ले लेखक रितेश शाह आणि झी स्टुडिओला प्रतिवादी करण्यात आले आहे.
मोहालीतील दोघांनी पाच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
दरम्यान, मोहाली येथील रहिवासी गुरिंदर सिंग आणि गुरमोहन सिंग यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या दोघांनीही याचिकेत म्हटले होते की, या चित्रपटात शीख धर्मीयांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जर हा चित्रपट अशा प्रकारे प्रदर्शित झाला तर त्यामुळे शिखांच्या भावना दुखावल्या जातील. शिखांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट मुद्दाम बनवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तज्ज्ञांचे एक पॅनल तयार करावे, ज्यामध्ये एसजीपीसी सदस्यांचा समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांना हा चित्रपट दाखवावा आणि चित्रपटातून वादग्रस्त दृश्ये कापून टाकावीत. त्यानंतरच त्याला सोडण्यात यावे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)