Tejasswi Prakash New Car: तेजस्वी प्रकाशने खरेदी केली एवढ्या कोटींची कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यावेळी टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश खूप आनंदी दिसत होती. त्याचवेळी अभिनेता करण कुंद्राही तेजस्वीसोबत या क्षणांचा आनंद घेताना दिसला.

Tejasswi Prakash (Photo Credit - Instagram)

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आपल्या नवीन कारमुळे सतत चर्चेत आहे. तेजस्वीने मुंबईत (Mumbai) तिच्या स्वप्नांची कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तेजस्वीने गाडीची पूजा करण्यापासून ते  करण कुंद्रापर्यंतचे सगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तेजस्वीनं गुढीपाडव्याला ऑडी क्यू 7 आलिशान गाडी घेतली आहे. पण शूटिंगमध्ये ती बिझी होती, त्यामुळे तीन दिवसानंतर ती ही कार घरी घेऊन जाण्यासाठी शोरूममध्ये गेली. तेजस्वी प्रकाश करण कुंद्रासोबत कार शोरूममध्ये पोहोचल्याचे दिसुन आली आहे. अभिनेत्रीने नियमानुसार कार घरी नेण्यापूर्वी पूजा केली. स्वतः नारळ फोडण्याचाही प्रयत्न केला. अभिनेत्रीला नारळ फोडण्यात काही अडचण आली असली तरी करण कुंद्रा तिला मदत करताना दिसला.

गाडीची किंमत

तेजस्वी प्रकाश यांनी चमकदार पांढऱ्या रंगाची ऑडी Q7 कार खरेदी केली आहे ज्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे बोले जात आहे. कार खरेदी करण्यापासून ते नारळ फोडण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण या अभिनेत्रीने कॅमेऱ्यात कैद केला. यावेळी टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश खूप आनंदी दिसत होती. त्याचवेळी अभिनेता करण कुंद्राही तेजस्वीसोबत या क्षणांचा आनंद घेताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

 

तेजस्वी मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज

तेजस्वी प्रकाश (Tejassawi Prakash) मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या सोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे (Abhinay Berde) झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi re) या सिनेमाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे.