Cannes 2022 Aishwarya Rai and Deepika Padukone Red Carpet Look: ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोणच्या रेड कार्पेटवरील लुकने चाहत्यांना पाडली भुरळ; पहा खास फोटोज

यावेळीही ऐश्वर्या रायने रेड कार्पेटवर ग्रँड एन्ट्री करत आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मने जिंकली. तर दीपिका पदुकोणने तिच्या रेड हॉट लूकने सर्वांना थक्क केले. या दोघींनी ट्रोल्सची तोंडेच बंद केली आणि रेड कार्पेटला चार चाँद लावले.

Aishwarya Rai and Deepika Padukone Red Carpet Look (PC - Instagram)

Cannes 2022 Aishwarya Rai and Deepika Padukone Red Carpet Look: कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा लुक चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरला आहे. यावेळीही ऐश्वर्या रायने रेड कार्पेटवर ग्रँड एन्ट्री करत आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मने जिंकली. रेड कार्पेटशिवाय ऐश्वर्या राय बच्चनचे आणखी दोन लूक समोर आले होते, ज्यासाठी तिला प्रचंड ट्रोल केले जात होते. ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर पोहोचून सर्वांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दीपिका पदुकोणने तिच्या रेड हॉट लूकने सर्वांना थक्क केले. या दोघींनी ट्रोल्सची तोंडेच बंद केली आणि रेड कार्पेटला चार चाँद लावले.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोणने आपल्या अपिरियंसने सर्वांना थक्क केले. लाइट पिंक कलरच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या राय इतकी सुंदर दिसत होती की, सगळे तिच्याकडे बघतच राहिले. यावेळीही तिने आपला मेकअप साधा ठेवला आणि केस मोकळे सोडले. याआधी अॅश गडद गुलाबी रंगाच्या ओव्हरसाईज सूटमध्ये दिसली होती. त्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावरही ऐश्वर्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण आता तिने आपल्या लूकने हे सिद्ध केले आहे की, दरवेळेप्रमाणे तिला या वेळीही मन जिंकायचे आहेत. (हेही वाचा - Kangana Ranaut: ज्ञानवापी प्रकरणावर कंगनाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली - 'काशीमध्ये कणा कणात महादेव')

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Rai Bachchan 👸 (@aishawryarai)

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या तिसऱ्या दिवशी दीपिका पदुकोण लाल रंगाच्या गाऊनमध्ये जबरदस्त पोज देताना दिसली. तिचा हा लूक लोकांना खूप आवडला. लाल गाऊनमध्ये दीपिका पदुकोण खूपच क्लासी दिसत आहे. दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहेत. चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. दीपिका तू सर्वात सुंदर आहेस, अशी कमेंट एका यूजरने केली आहे. तर एकाने लिहिले 'तुझ्या या लूकने सगळ्यांची बोलतीच बंद केली आहे'.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajesh Kumar (RAJ) (@marketing.by.raj)

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 चा तिसरा दिवस खूपच प्रेक्षणीय होता. आर्मगेडन टाईम या चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन देखील रेड कार्पेटवर थिरकताना दिसली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 मे ते 28 मे पर्यंत चालणार आहे आणि यंदाचा कार्यक्रम भारतासाठी खूप खास असणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement