कर्करोगाशी झुंज देणा-या अभिनेत्री Kirron Kher यांचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आभार मानत मुलगा सिकंदरला दिला 'हा' सल्ला
या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) देखील दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी किरण खेर यांनी आपल्या मुलाला एक सल्ला दिला आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय तसेच ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. त्या लवकरात लवकर ब-या व्हाव्यात यासाठी त्यांच्या कुटूंबियांसह त्यांचे असंख्य चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान किरण खेर यांचा आपल्या कुटूंबियांसह केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर (Sikandar Kher) याने केला आहे. सिकंदर या व्हिडिओमधून चाहत्यांना किरण खेर यांच्या तब्येतीचे अपडेट्स देत आहे. या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) देखील दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी किरण खेर यांनी आपल्या मुलाला एक सल्ला दिला आहे.
सिकंदरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण खेर यांनी चाहत्यांना प्रेम व शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. व्हिडीओ शेअर करताना सिकंदरने लिहिले आहे की, ‘खेर साहब आणि किरण मॅम. हा खूप क्युट आणि छोटासा व्हिडीओ आहे. माझ्या कुटूंबाकडून नमस्कार. माझ्या आईसाठी आपण जे प्रेम पाठवले त्याबद्दल सर्वांचे आभार.’हेदेखील वाचा- Anupam Kher यांनी पत्नी Kirron Kher यांच्या निधनाच्या अफवांवर दिले स्पष्टीकरण, अभिनेत्रीची प्रकृती अत्यंत उत्तम असल्याची दिली माहिती
व्हिडीओच्या सुरुवातीस सिकंदर म्हणतो की, तो आपल्या कुटुंबासमवेत बसला आहे. आपण श्रीमती खेर यांच्या पायांची झलक पाहू शकता. त्यानंतर तो कॅमेरा त्याच्या आईच्या पायाकडे फिरवतो आणि म्हणतो की आपण आपल्या पायानेच प्रत्येकाला हाय म्हणा. या दरम्यान किरण खेर पलंगावर विश्रांती घेताना दिसत आहे आणि आपल्या गोड आवाजात सर्वांना हाय म्हणतात.
जेव्हा सिकंदर व्हिडिओ बंद करण्यास सुरवात करतो, तेव्हा किरण खेर त्याला व्हिडीओमध्ये आपला चेहरा दाखवण्यास सांगतात. तेव्हा तो कॅमेरा घेऊन आईकडे जातो. त्यानंतर किरण खेर सर्वांना हॅलो म्हणतात. तर, चाहत्यांच्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. याच वेळी त्यांनी लेकाला अर्थात सिकंदर खेर याला लग्न करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
काही दिवसांपूर्वी किरण खेर आपल्या कुटुंबासमवेत कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या होत्या. यानंतर त्या एकदम ठीक असून, या केवळ अफवा असल्याचे अनुपम खेर यांनी स्पष्ट केले होते.