CAA: 'फरहान अख्तर याने गुन्हा केला आहे, मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी,' जाणून घ्या आयपीएस अधिकाऱ्याने का केली अशी मागणी

19 तारखेला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात भेटू. फक्त सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ आता संपली आहे."

Sandeep Mittal, IPS officer, Farhan Akhtar (Photo Credits: Twitter, Facebook)

Bollywood Actor Farhan Akhtar on CAA: फरहान अख्तर हा बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल आपली प्रतिक्रिया मंडळी आहे. CAA विरोधात देशभरात अनेक निदर्शने होत आहेत आणि दिल्लीतील जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून हिंसक आंदालनं देखील करण्यात येत आहेत. आयुष्मान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोपडा, आलिया भट्ट, अनुराग कश्यप यासारख्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी याविरुद्ध आवाज उठवत चिंता व्यक्त केली. फरहान अख्तर याने आपल्या एका ट्विटमध्ये तो 19 तारखेला मुंबईत होणाऱ्या CAA आणि NRC विरोधात आंदोलनात सामील होणार असल्याचे नमूद केले होते आणि आता त्याच्या या ट्विटने त्याला अडचणीत आणले आहे.

फरहान अख्तर याने आज सकाळी ट्विट करत लिहिले की, “हा निषेध का महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल काय माहित असणे आवश्यक आहे ते इथे लिहिले आहे. 19 तारखेला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात भेटू. फक्त सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ आता संपली आहे."

फरहानच्या या ट्विटवर लगेचच वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी उत्तर देत, फरहानच्या निदर्शनास आणून दिले आहे की त्याने कायदा मोडला आहे. तसेच मुंबई पोलिस आणि भारतीय तपास यंत्रणेला त्यांनी टॅग करत फरहानवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

CAA: 'आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे?' शशांक केतकर चा नेटकऱ्यांना सवाल

आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी दंड संहितेच्या कलम 121 मध्ये स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही भारतीय दंड संहितेचा 121 कलमांतर्गत गुन्हा केला आहे आणि तो नकळत नाही. @MumbaiPolice आणि  @NIA_India  तुम्ही ऐकत आहात ना? कृपया आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणार्‍या राष्ट्राचा विचार करा. कायदा समजून घ्या. ”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप मित्तल यांनी जामिया मिलिया विद्यापीठ परिसरातील हिंसक आंदोलनाचा निषेध करत जावेद अख्तर यांच्या ट्विटला प्रत्युत्तरही दिले होते.



संबंधित बातम्या

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून