Breathe: Into The Shadows: अभिषेक बच्चनचे वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण; शेअर केले आपल्या पहिल्या Web-Series चे पोस्टर

रिफ्युजी या चित्रपटाद्वारे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्यासोबत करीना कपूरचाही हा पहिला चित्रपट होता. आता इतक्या वर्षांमध्ये करीना कपूरने आपली कारकीर्द चांगलीच गाजवली,

Breathe: Into The Shadows: अभिषेक बच्चनचे वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण; शेअर केले आपल्या पहिल्या Web-Series चे पोस्टर
Breathe Into The Shadows (Photo Credits: Instagram) .. Read more at: https://www.latestly.com/entertainment/breathe-into-the-shadows-abhishek-bachchan-amit-sadhs-amazon-prime-series-begins-promotions-with-a-sinister-poster-1817931.html

रिफ्युजी या चित्रपटाद्वारे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्यासोबत करीना कपूरचाही हा पहिला चित्रपट होता. आता इतक्या वर्षांमध्ये करीना कपूरने आपली कारकीर्द चांगलीच गाजवली, मात्र अभिषेक बच्चन आपली कमाल दाखवू शकला नाही. आता अभिषेक बच्चन याने आपल्या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. होय, बर्‍याच काळापासून असा अंदाज वर्तविला जात होता की, अभिषेक बच्चन अ‍ॅमेझॉन प्राइची वेब सीरिज ब्रीदच्या (Breathe: Into The Shadows) दुसऱ्या सीझनमध्ये दिसू शकतो. आता अभिषेकने या वेब सिरीजचे पोस्टर रिलीज केले आहे. ब्रीदचे पोस्टर शेअर करत त्याने या वृत्ताची पुष्टी केली आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिषेक डिजिटल क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज आहे.

पहा पोस्टर -

अभिषेक बच्चन याने आपल्या ट्विटरवर 'ब्रीद'चे पोस्टर शेअर केले आहे व यासोबत तो लिहितो, 'She lies into the shadows, waiting to be found. Here is the First Look of #BreatheIntoTheShadows'. या सिरीजद्वारे दक्षिण भारतातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक, नित्या मेनन देखील डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. यामध्ये सय्यामी खेर देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. अशी ही बहुप्रतिक्षित सिरीज Amazon Prime वर जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये आणि प्रांतांमध्ये, 10 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

या सिरीजचे दिग्दर्शन मयंक शर्मा करत आहेत. 2018 साली आर. माधवनची ब्रीद ही सिरीज प्रदर्शित झाली होती. आता अभिषेकची ही सिरीज त्या सिरीजचा सिक्वेल आहे. आर माधवन आणि अमित सध स्टारर अ‍ॅमेझॉनच्या या वेब सीरिजला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. यावेळी अभिषेक बच्चन, आर माधवन ऐवजी या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2020 06:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).