Farah Khan's Twitter Account Gets Hacked: फराह खान चे ट्विटर अकाऊंट हॅक; इंस्टाग्रामवर दिली माहिती
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांचे ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. यासंदर्भात फराह खान यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे.
Farah Khan's Twitter Account Gets Hacked: बॉलिवूड सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होणं हे बाब काही नवीन नाही. आतापर्यंत सर्व मोठ्या स्टार्सची खाती हॅक झाली आहेत. आता बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan's) यांचे ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. यासंदर्भात फराह खान यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे. यात फराहने आपले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्या इंस्टा अकाउंट रिकवर झाले असून ट्विटर अकाऊंट अद्याप रिकवर झालेले नाही.
इंस्टाग्रामवर माहिती देताना फराह खान यांनी म्हटलं आहे की, काल संध्याकाळी माझे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. कृपया कोणत्याही प्रकारचे उत्तर देऊ नका. त्या खात्यातून येणारा मेसेज हॅक असू शकतो. यासह, फराहने पुढे लिहिलं आहे की, माझे इंस्टावर अकाऊंटही हॅक करण्यात आले होते. ज्यामुळे माझी बरेच फोटो गायब झाले आहेत. परंतु, आम्ही इन्स्टा खाते पुनर्प्राप्त केले आहे. धन्यवाद माझे संगणक अभियंता शिरीष कुंदर. आशा आहे की, लवकरचं ट्विटर अकाऊंटही रिकवर होईल. (हेही वाचा - Yearender 2020: चित्रपटसृष्टीतील 'या' दिग्गज कलाकारांनी 2020 मध्ये घेतला जगाचा निरोप)
दरम्यान, यापूर्वी अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, करण जोहर, श्रुति हसन, अनुपम खेर, शाहिद कपूर, रकुल प्रीत, उर्वशी रौतेला, हृतिक रोशन अशा सर्व स्टार्सचे अकाउंट्स हॅक झाले आहेत.