Sharad Kapoor Accused of Misconduct: बॉलिवूड अभिनेता शरद कपूरवर गैरवर्तनाचा आरोप; महिलेला घरी बोलावून केला बलात्कार करण्याचा प्रयत्न
यानंतर पीडित तरुणीने शरद कपूर सोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. शरदने तिला शूटिंगबद्दल बोलण्यासाठी भेटायचे असल्याचे सांगितले. यानंतर त्याने फोनद्वारे पीडितेला लोकेशन पाठवले.
Sharad Kapoor Accused of Misconduct: तमन्ना, दस्तक, त्रिशक्ती, जोश आणि इसकी टोपी उसके सर या चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलिवूड अभिनेता शरद कपूरवर (Sharad Kapoor) एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. सुरुची शर्मा नावाच्या मुलीने दावा केला आहे की, अभिनेत्याने तिला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी त्याने तिच्यासोबत गैरवर्तन (Misbehavior) केले. शरदने आपल्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून शरदच्या संपर्कात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर पीडित तरुणीने शरद कपूर सोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. शरदने तिला शूटिंगबद्दल बोलण्यासाठी भेटायचे असल्याचे सांगितले. यानंतर त्याने फोनद्वारे पीडितेला लोकेशन पाठवले. तरुणीला खार येथील कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. मात्र, तेथे गेल्यावर तिला समजले की, हे अभिनेत्याचे कार्यालय नसून घर आहे. (हेही वाचा -Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे)
पीडितेने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ती शरदच्या घरी पोहोचल्यावर अभिनेत्याने तिला हाक मारली आणि बेडरूममध्ये येण्यास सांगितले. शरद तिथे कपड्यांशिवाय बसल्याचे तिने पाहिले. त्यानंतर ती घाबरली. तरुणीने शरद कपूरला कपडे घालण्यास सांगितले. पण शरदने तिला ‘किस मी’, ‘हग मी’ असं म्हटलं. यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने लगेच शरदला ढकलून तिथून पळ काढला. सुरुचीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. (हेही वाचा -‘All We Imagine As Light’: 'प्रसिद्धीसाठी कपडे काढण्याची गरज नाही', न्यूड सीन ऑनलाइन लीक प्रकरणावर दिव्या प्रभा हिचे सडेतोड उत्तर)
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून कलम 74 (महिलावर बळजबरी), कलम 75 (महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध छळ करणे), कलम 79 (महिलेवर अत्याचार करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कपूर शाहरुख खान सारख्या सुपरस्टारसोबत 'जोश' चित्रपटात दिसला आहे. तो गोविंदासोबत ‘क्यूंकी मैं झुठ नहीं बोलता’ या चित्रपटातही दिसला होता.