कॅन्सर सोबत संघर्ष करत असलेला Sanjay Dutt या महिन्यापासून सुरु करणार KGF चे शूटिंग, इंन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती
तर संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समजात त्याच्या चाहत्यांसह परिवाराने त्याची प्रकृती लवकरच सुधरावी यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे दिसून आले.
बॉलिवूड मधील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या कॅन्सर सोबत झुंज देत आहे. तर संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समजात त्याच्या चाहत्यांसह परिवाराने त्याची प्रकृती लवकरच सुधरावी यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे दिसून आले. तसेच संजय दत्त याने आपल्या आजावर उपचार घेण्यासाठी कामापासून थोडा वेळ ब्रेक घेत असल्याचे ही स्पष्ट केले होते. मात्र आता संजय दत्त याने पुन्हा एक पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. तर पोस्टमधील व्हिडिओ संजय दत्त याने असे म्हटले आहे की, या आजारावर पूर्णपणे मात करणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्याचसोबत हा व्हिडिओ हेअरस्टायलिस्ट आलिम हकीम याने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये संजय दत्त याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
संजय दत्त याने या व्हिडिओ KGF Chapter 2 आणि शमशेरा सारख्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे. संजय याने असे म्हटले की, मी माझी दाढी वाढवत आहे. शेव केली होती पण केजीएफच्या भुमिकेसाठी त्या पद्धतीच्या लूकची गरज आहे. आम्ही नोव्हेंबर महिन्यात शूटिंग सुरु करणार आहोत. मी अत्यंत आनंदीत असून पुन्हा एकदा सेटवर काम करण्यास मिळणार आहे. उद्या शमशेरा याचे डबिंग सुद्धा आहे तेथे ही मजा येणार आहे. पुन्हा एकदा येऊन खुप आनंदीत वाटत आहे. दरम्यान, संजय केजीएफ चॅप्टर 2 मध्ये संजय दत्त मुख्य विलन अधीरा याची भुमिका साकारत आहे. या चित्रपटातील संजयचा लूक सुद्धा फार चर्चेत असून त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.(Sanjay Dutt New Look: कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या अभिनेता संजय दत्त चा नवा लूक, त्याची ही अवस्था पाहून चाहते म्हणाले 'Get Well Soon')
वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास संजय दत्त याचा चित्रपट सडक 2 प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि पूजा भट्ट सारखे बडे कलाकार दिसून आले होते. मात्र सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांनी या चित्रपटावर टीका करत संताप व्यक्त केल्याचे दिसून आले होते. या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबर 12 मिलियन पेक्षा अधिक जणांनी डिसलाइक्स केला होता.