Ganeshotsav 2020: अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरी बाप्पाचं आगमन; पहा फोटोज
बाप्पाच्या आगमनाचे फोटोज नील नितीन मुकेश याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उद्या (22 ऑगस्ट) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) असल्याने काही जणांच्या घरी आजच बाप्पाचं आगमन झालं आहे. बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) याच्या घरीही बाप्पा आले आहेत. बाप्पाच्या आगमनाचे फोटोज नील नितीन मुकेश याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या सावटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तसंच आगमन आणि विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे नील देखील गणपती बाप्पा सह एकटाच दिसत आहे.
बाप्पाच्या आगमनाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत नील नितीन मुकेश याने 'गणपती बाप्पा मोरया' असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवातील साधेपण या फोटोतून दिसून येत आहे. (अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झाले गणपती बाप्पांचे आगमन; मोठ्या भक्तिभावाने सुरु झाली गणेशोत्सवाची तयारी, Watch Video)
पहा फोटोज:
कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नसला तरी सणाचा आनंद काही कमी झालेला नाही. बाप्पाच्या आगमनाची तितकीच आतुरता आणि त्यानंतरच्या काही दिवसांची उत्सुकता प्रत्येकाच्या मनी आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची, पूजेची तयारी सर्वत्र सुरु आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांची गणेशोत्सवानिमित्त लगबग सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामय झाले आहे आणि पुढील 10 दिवस आपल्याला असेच वातावरण अनुभवायला मिळणार आहे.