नवाजुद्दीन सिद्दीकी ईद 2020 च्या सेलिब्रेशनसाठी कुटुंबासह उत्तर प्रदेशात दाखल; पोलिसांनी दिले 14 दिवस Home Quarantine चे आदेश

मात्र आता त्याला स्थानिक पोलिसांनी होम क्वारंटीन राहण्याचे आदेश दिले आहेत.

Nawazuddin Siddiqui (Photo Credits: Getty Images)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Bollywood actor Nawazuddin Siddiqui)आणि त्याच्या परिवाराला उत्तर प्रदेश मध्ये 14 दिवसांसाठी होम क्वारंटीन राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईद 2020 च्या सेलिब्रेशनसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या कुटुंबासह मुझ्झफरनगर जिल्ह्यातील बुधाणा (Budhana) येथील त्याच्या मूळ घरी गेला आहे. दरम्यान नवाझ सह त्याच्या कुटुंबियांची मेडिकल स्क्रिनिंग आणि कोरोना चाचणी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, 15 मे दिवशी नवाझुद्दीन उत्तर प्रदेशामध्ये त्याच्या घरी पोहचला. दरम्यान येत्या 25 मे पर्यंत त्याच्यासह कुटुंबाला होम क्वारंटीन राहण्याचे आदेश आहेत. पोलिसांकडून रितसर पास घेऊन खाजगी वाहनाने नवाझ त्याच्या आई, भाऊ आणि वहिनीसोबत उत्तर प्रदेशमध्ये पोहचला आहे. प्रवासादरम्याअन 25 ठिकाणी त्याची मेडिकल स्क्रिनिंग झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. बुधाना पोलिस स्टेशनच्या ऑफिसरने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरी जाऊन 14 दिवस क्वारंटीन राहण्याचे आदेश दिले आहेत.

PTI Tweet 

'घुमकेतू' मधून नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनुराग कश्यप, इला अरूण, रघुवीर यादव, स्वानंद किरकिरे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील तर अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा यांची विशेष भूमिका आहे. फॅन्टम फिल्म आणि सोनी पिक्चर नेटवर्क निर्मित हा सिनेमा ZEE5 वर 22 मे दिवशी रिलीज केला जाणार आहे.