Akshay Kumar Films in 2021: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यंदा 'या' 6 चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर उडवणार खळबळ; पहा चित्रपटांची लिस्ट

कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे 2020 मध्ये बरेच मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. हे चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे एकूण 6 चित्रपट आहेत.

अक्षय कुमार (Photo Credits: Instagram)

Akshay Kumar Films in 2021: 2020 या वर्षाच कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे बरेच मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. हे चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) एकूण 6 चित्रपट आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख ठरलेली नाही. जर परिस्थिती सामान्य झाली तर या चित्रपटाच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. साधारण एका वर्षात अक्षय कुमारचे 3 ते 4 चित्रपट प्रदर्शित होत असतात. अक्षय कुमारचे चित्रपट चित्रपटगृहांसाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत. कारण, यातून चित्रपटगृहांना मोठा नफा मिळतो.

गेल्या काही वर्षांत अक्षयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशाची नवी कहाणी लिहिलेली आहे. 2019 मध्ये अक्षय कुमारचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी हाऊसफुल 4, मिशन मंगल आणि गुड न्यूज यांनी 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तसेच केसरीने 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे निर्मातेसमवेत सिनेमा मालकही अक्षय कुमारच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. 2021 या वर्षात अक्षय कुमारचे खालील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. (Tribhanga Trailer: बॉलिवूड अभिनेत्री काजोल च्या 'त्रिभंगा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पहा हृदयस्पर्शी कथा)

सूर्यवंशी -

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

रोहित शेट्टी यांच्या सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमरा एटीएस चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सिंबा रणवीर सिंग आणि सिंघम अजय देवगन कॅमिओमध्ये आहेत, तर कतरिना कैफ महिला लीडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2020 च्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचा कॅनव्हास पाहता रोहित शेट्टीने तो ओटीटीवर प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आणि आता हा चित्रपट 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सूर्यवंशी प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित केलेली नाही.

बच्चन पांडे -

बच्चन पांडे 2020 मध्ये ख्रिसमसच्या सनानिमित्त रिलीज होणार होता. पण आमिर खानच्या लालसिंग चड्ढामुळे हा चित्रपट 22 जानेवारी 2021 रोजी रिलीज होण्याची घोषणा करण्यात आली होती. पण त्याचे शूटिंग 2020 मध्ये सुरू होऊ शकले नाही. अलीकडे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यात अक्षय कुमारची देखील भूमिका असण्याची शक्यता आहे. जॅकलिन फर्नांडिसदेखील या चित्रपटाच्या मुख्य कलाकारातील एक भाग आहे.

बेलबॉटम -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटाचे शूटिंग अक्षयने पॅनडेमिकच्या दरम्यान ग्लासगो (स्कॉटलंड) मध्ये 40 दिवसांत पूर्ण केले. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

अतरंगी रे -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार पहिल्यांदा आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत आहे. या चित्रपटात तमिळ स्टार धनुष मुख्य भूमिकेत आहे, तर सारा अली खान ही महिला अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट यंदा रिलीजही होऊ शकेल.

पृथ्वीराज -

केसरीनंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा हिस्टोरिकल चित्रपटात काम करत आहे. पृथ्वीराज बॅनर चित्रपटाचे दिग्दर्शन चाणक्य फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या या कथेत मानुषी छिल्लर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पृथ्वीराज चित्रपट गेल्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

रक्षाबंधन -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

2020 मध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने 'रक्षाबंधन' चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट यावर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या कौटुंबिक नाटकात अक्षय कुमार भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now