बिपाशा बसु हिने आजवर दिलेल्या Kissing Scenes च्या बाबत सांगितला शॉकिंग अनुभव, डेंजरस वेब सीरिज निमित्त दिलेली ही मुलाखत वाचा
बॉलिवूड मध्ये आपल्या हॉरर मूव्हीज आणि हॉटनेस मुळे अजुनही चर्चेत असलेली बिपाशा बसु (Bipasha Basu) आपली नवी वेबसीरीज डेंजरस (Dangerous) च्या माध्यमातुन प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने किसिंग सीन्सच्या बाबत मोठा खुलासा केला आहे.
बॉलिवूड मध्ये आपल्या हॉरर मूव्हीज आणि हॉटनेस मुळे अजुनही चर्चेत असलेली बिपाशा बसु (Bipasha Basu) आपली नवी वेबसीरीज डेंजरस (Dangerous) च्या माध्यमातुन प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने तिने स्पॉटबॉय या वेबसाइटला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये बिपाशाने आपण आजवरच्या करिअर मध्ये दिलेल्या किसिंग सीन बाबत शॉकिंग खुलासा केला आहे. जर का कोणा फॅनला बिपाशाच्या किसिंग सीन्स (Kissing Scenes) बाबत विचारले तर साहजिकच हॉट अशीच प्रतिक्रिया अधिक ऐकु येईल मात्र यासाठी अभिनेत्री म्हणुन प्रचंड मानसिक तणावातुन जावंं लागत होतंं, “किसिंग सीन्स शूट करणं अत्यंत कठीण काम असतं. या दृश्यांमुळे अस्वस्थ व्हायला होतं" असं बिपाशाने म्हंटलंं आहे.
बिपाशा बासू ने लग्नानंंतर आपला पती करणसिंंह ग्रोवर यासोबतच अधिकतः काम केलं आहे, याबाबत सांगताना ती म्हणते की “नवरा सहकलाकार असेल तर इंटिमेट सीन्स करताना मानसिक तणाव जाणवत नाही. पण अनोळखी कलाकारासोबत अशी दृश्य चित्रीत करणं सोप नसत. आपण कितीही प्रोफेशनल आप्रोच ठेवला तरी कॅमेरासमोर किस करताना दडपण येतंच. यापूर्वी अशी दृश्य चित्रीत होऊ नये यासाठी मी प्रयत्न करायचे. मला भीती वाटते, मला चक्कर येतेय. मला बरं वाटत नाहीये अशी कारण मी अनेकदा दिली आहेत."
बिपाशा बासु पोस्ट
View this post on Instagram
All the best to the team of #dangerous #Repost @mxplayer with @get_repost ・・・ Your wait is finally over, find the answer to this #Dangerous mystery now! All episodes are out. Link in the bio. @bipashabasu @iamksgofficial @suyyashrai @isonaliraut @natashasuri @nitinaroraofficial @vikrampbhatt @mikasingh @bhushanpatel #MXPlayer
A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on
दरम्यान, ‘डेंजरस’ ही क्राईम मिस्ट्री अशा धाटणीची वेब सीरिज आहे. एमएक्स प्लेअरवर ही वेबसीरीज प्रदर्शित झाली असुन यातही तिने अनेक इंटिमेट सीन्स केले आहेत. सध्या तरी वेबसीरीज ला चांंगला प्रतिसाद आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)