Biopic of Ujjwal Nikam: सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; Oh My God फेम दिग्दर्शक उमेश शुक्ला बनवणार चित्रपट
'ओएमजी: ओह माय गॉड' (Oh My God) आणि '102 नॉट आउट' सारखे उत्कृष्ट चित्रपट बनविणारे दिग्दर्शक उमेश शुक्ला (Umesh Shukla), आता मोठ्या गुन्हेगारांविरूद्ध खटला लढणार्या देशातील एका नामांकित वकीलावर चित्रपट बनवणार आहेत
'ओएमजी: ओह माय गॉड' (Oh My God) आणि '102 नॉट आउट' सारखे उत्कृष्ट चित्रपट बनविणारे दिग्दर्शक उमेश शुक्ला (Umesh Shukla), आता मोठ्या गुन्हेगारांविरूद्ध खटला लढणार्या देशातील एका नामांकित वकीलावर चित्रपट बनवणार आहेत. आम्ही बोलत आहोत सरकारी वकील उज्ज्वल निकम (Public Prosecutor Ujjwal Nikam) यांच्याबद्दल. उमेश शुक्ला यांनी एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखती दरम्यान उज्ज्वल निकम यांच्या बायोपिक बाबत पुष्टी केली. उज्ज्वल निकम यांनी 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन खून प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाबविरूद्ध सरकारी वकील म्हणून लढा दिला आहे.
जेव्हा देशातील कोणत्याही मोठ्या गुन्ह्याची घटना न्यायालयात पोहोचते तेव्हा केंद्रात कोणते सरकार आहे हे महत्वाचे न ठरता, अनेकदा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांचीच निवड केली जाते. आता उमेश शुक्ला उज्वल निकम यांचा जीवनप्रवास आपल्या चित्रपटाद्वारे मांडणार आहेत. आपल्या या आगामी प्रकल्पाविषयी बोलताना उमेश शुक्ला म्हणाले- ‘हो, माझा पुढचा चित्रपट सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आहे. स्क्रिप्ट जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी लवकरच मी कलाकारांशी संपर्क साधण्यास सुरूवात करीन. निर्माता म्हणूनही मी या प्रकल्पाबद्दल खूप उत्साही आहे.’ (हेही वाचा: Aai Majhi Kalubai मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ची एक्झिट; वीणा जगताप दिसणार मुख्य भूमिकेत)
ते पुढे म्हणाले. ‘पुढच्या वर्षाची सुरुवात आपण अनेक नव्या प्रकल्पांसह करू. त्यातील एक चित्रपट नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत करणार आहे, ज्याचे दिग्दर्शन सेजल शाह करणार आहेत.’ सध्या उमेश त्यांच्या आगामी ‘आँख मिचौली’ चित्रपटाचे शेवटचे एडिटिंग करत आहेत. लॉक डाऊन लागू होण्यापूर्वी त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. चित्रपटाचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये 15 दिवस तर पंजाबमध्ये 40 दिवस केले गेले. उमेशचा हा चित्रपट कॉमेडीने भरलेला असेल. उमेश केवळ कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे म्हणून चित्रपट बनवत नाही, तर त्यांच्या चित्रपटांमध्ये एक सामाजिक संदेशही दडलेला असतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)