Bhojpuri Actress Monalisa Dance Video: भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने 'तुझको मिर्ची लगी..' गाण्यावर केला जबरदस्त डान्स; साडीमध्ये दिसला हॉट अंदाज
मोनालिसा (Photo Credits: Instagram)

Bhojpuri Actress Monalisa Dance Video: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) तिच्या मनोरंजक व्हिडिओ आणि हॉट फोटोंद्वारे दररोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. वरुण धवन आणि सारा अली खानच्या 'कुली नंबर. 1' (Coolie No.1) चित्रपटातील 'तुझको मिर्ची लागी तो' गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. आता मोनालिसाने या गाण्यावर तिच्या मनमोहक स्टाईलमध्ये डान्स करुन आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना मोनालिसाने मिर्चीची इमोजी पोस्ट केली आहे. या व्हिडिओला तिने "मी काय करू?" असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडिओला कमेंन्टस दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मोनालिसा पिवळ्या आणि केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे. (हेही वाचा - Salman Khan Turns 55: सलमान खान ने पनवेल फार्महाऊस वर कापला बर्थडे केक; पहा सेलिब्रेशनचे Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसा दररोज आपले नव-नवीन व्हिडिओ आणि फोटोंज शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजक करत त्यांच्याशी संवाद साधत असते. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास आहे. मात्र, मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर तिने आपले नाव 'मोनालिसा' ठेवले. मोनालिसाच्या वक्र फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मोनालिसा या दिवसात स्टार प्लस टीव्ही शो 'नजर 2' मध्ये डायनच्या भूमिकेत दिसत आहे.