Bheek Maango Andolan: नाशिकमध्ये Ajay Devgn विरोधात 'भीख मांगों आंदोलन'; पैसे गोळा करून अभिनेत्याला पाठवण्याचा चाहत्याचा विचार, जाणून घ्या कारण (Watch Video)
आता अजय देवगणबाबत (Ajay Devgn) अनोखा निषेध होत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एक व्यक्ती स्कूटीवर बॉलिवूडच्या 'सिंघम' विरोधात प्रचार करताना दिसली.
चित्रपट तारे लाखो लोकांसाठी आदर्श असतात. जेव्हा कलाकार चांगली कामे करतात तेव्हा हे चाहते त्यांना डोक्यावर घेतात मात्र, जेव्हा चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराचे काम आवडत नाही तेव्हा ते त्यांच्यावर टीका करायला मागे-पुढे पाहत नाहीत. सिनेसृष्टीतील ताऱ्यांची चमक केवळ त्यांच्या चाहत्यांमुळेच आहे. हे असे चाहते आहेत, जे एखाद्याला रातोरात स्टार बनवतात तसेच एखाद्याला क्षणार्धात जमिनीवरही आणतात. कलाकारांबाबत त्यांच्या चाहत्यांची नाराजी ही काही नवीन बाब नाही. विशेषत: गेल्या काही वर्षांत कलाकारांना त्यांच्या जाहिरातींमुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
तंबाखूच्या ब्रँडला मान्यता दिल्याचे परिणाम अक्षय कुमारसारख्या स्टारलाही भोगावे लागले आहेत. आता अजय देवगणबाबत (Ajay Devgn) अनोखा निषेध होत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एक व्यक्ती स्कूटीवर बॉलिवूडच्या 'सिंघम' विरोधात प्रचार करताना दिसली. या चाहत्याने 'बेगिंग फॉर अजय देवगण' नावाने हा विरोध सुरू केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्विटरवर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये स्कूटीवर बसलेला एक व्यक्ती अजय देवगणसाठी रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. अजय देवगणने ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन दिल्याने हा व्यक्ती त्याच्यावर नाराज आहे. ही व्यक्ती म्हणते, ‘अजय देवगणला पैशाची नितांत गरज आहे, म्हणून तो भीक मागून पैसे गोळा करेल व हे पैसे तो अभिनेत्याकडे पाठवेल. या अनोख्या निषेधासाठी त्याने त्याच्या स्कूटीवर स्पीकर आणि फलक लावले आहेत, ज्यावर लिहिले आहे, 'अजय देवगणसाठी भीक मागणे आंदोलन!' (हेही वाचा: Vivek Oberoi: विवेक ओबेरॉयची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक, अभिनेत्याने तीन व्यावसायिक भागीदारांविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार)
ट्विटरवर शेअर केलेल्या या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती लाऊड स्पीकरवर म्हणत आहे, 'मी ऑनलाइन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींना विरोध करत आहे. देवाच्या कृपेने या सेलिब्रिटींकडे खूप काही आहे आणि तरीही ते ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन देऊ इच्छितात ज्याचा तरुणांवर वाईट परिणाम होतो. मी ठरवले आहे की, रस्त्यावर भिक मागून मी पैसे गोळा करेन व ते पैसे अजय देवगणला पाठवीन आणि त्याने अशा जाहिरातींचा भाग बनू नये अशी विनंती करेन. जर त्याला आणखी पैशांची गरज असेल तर मी पुन्हा अशा प्रकारे भीक मागून पैसे पाठवीन. पण कृपया अशा जाहिरातींचा प्रचार करू नका.’