Bharat Song Slow Motion: भारत सिनेमाचं 'स्लो मोशन' हे पहिलं गाणं प्रदर्शित, सलमान खान आणि दिशा पटाणीचा रेट्रो लूक झाला हिट (Watch Video)
Salman Khan, Disha Patani आपल्या हटके अंदाजात थिरकताना दिसून आले.
'भारत' (Bharat) या आगामी चित्रपटाचं पाहिलं वहिलं 'स्लो मोशन' (Slow Motion) हे गाणं 24 एप्रिलला (24 April) चित्रपटाच्या टीमकडून प्रदर्शित करण्यात आलं. या निमित्ताने सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सलमान खान (Salman Khan) आणि दिशा पटाणी (Disha Patani) यांच्या जोडीने बॉलीवूड (Bollywood) प्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. सर्कसच्या (Circus) सेटवर चित्रित केलेल्या या गाण्यात हे स्टार्स आपल्या हटके अंदाजात थिरकताना पाहायला मिळतायत.
या गाण्यात सलमानला रेट्रो लूक (Retro Look) देण्यात आला आहे, मौत का कुंवा मध्ये स्टंट्स करत सलमानने गाण्यात एंट्री घेत सगळ्यांना चकित केलं. या सोबतच सर्कस आर्टिस्टची भूमिका करणाऱ्या दिशा पटाणीने देखील पिवळ्या साडीत आपल्या हॉट अदा दाखवून प्रेक्षकांच्या माना वळवल्या आहेत.'स्लो मोशन" गाणं प्रदर्शित होण्याआधी त्याचा टीझर लाँच करण्यात आला होता त्यामुळे भाईजान सलमानच्या फॅन्समध्ये गाण्याविषयी उत्सुकता वाढली होती, आणि आता गाण्यातला सलमान-दिशाचा हॉट अवतार पाहून फिल्म कशी असेल याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
सोशल मीडियावर हे गाणं प्रदर्शित करत सलमानने एक ट्विट केलं होतं ज्यात त्याने, "आजा डूब जाऊं तेरे आँखो के ओशन में ,स्लो मोशन में, सुनो,नाचों, और शेअर करो" असं म्हंटल आहे. इर्शाद कामिल (Irshad Kamil) लिखीत या गाण्याला विशाल-शेखर (Vishal-Shekhar) या अफलातून जोडीने संगीत दिलंय, नक्ष अझीझ (Naksh Aziz) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी गायलेलं हे गाणं सध्या युट्युब (Youtube) वर 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवत धुमाकूळ घातला आहे.
सलमान खान ट्विट
भारत या सहा दशकांची गोष्ट मांडणाऱ्या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) सोबतच कैटरीना कैफ (Katrina Kaif), दिशा पटानी (Disha Patani) यांचे वेगवेगळे अवतार पाहता येणार आहेत याशिवाय सुनील ग्रोवर (Sunil Grover), तब्बू (Tabu) यांनी देखील चित्रपटात ताकदीची भूमिका साकारली आहे. 22 एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता त्याला देखील 33 मिलिअनच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.
भारत सिनेमाचा ट्रेलर
या पूर्वी टायगर जिंदा है, सुलतान सारखे पाठोपाठ हिट्स दिलेल्या दिग्दर्शक अब्बास जफर (Abbaz Jafar) यांचा 'भारत' येत्या 5 जूनला ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.