Ananya Panday Hot Photos: लेहंगा चोली मधील अनन्या पांडे चा हॉट अवतार; पहा फोटोज
Ananya Panday (Photo Credits: Instagram)

स्टूडेंट ऑफ द ईयर 2 (Student of The Year 2) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अनन्या पांडे (Ananya Pande) अलिकडे चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटोज, व्हिडिओज शेअर करुन तिने चांगला चाहतावर्ग निर्माण केला आहे. या चाहत्यांना लेटेस्ट अपडेट्स देत तिने खिळवून ठेवले आहे. अनन्या हॉट आणि बोल्ड फोटोजची ही सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा हा बिनधास्त अंदाज चाहत्यांनाही भावतो. दरम्यान, अनन्याचे नवे हॉट फोटोज समोर आले आहेत.

या नव्या फोटोमध्ये अनन्या अत्यंत हॉट दिसत आहे. लेहंगा चोली मधील तिचा ट्रेडिशनल हॉट अवतार अनोखा आहे. चाहत्यांनी देखील या फोटोंना भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अनन्याच्या नटखट अदा आणि स्टायल स्टेटमेंट यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.  ('Liger' First Look: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

यापूर्वी अनन्या पांडे च्या बिकीनी फोटोजनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अभिनेता ईशान खट्टरसोबत मालदीव येथील फोटोज अनन्याने शेअर केले होते. ईशान खट्टर सोबतच्या मैत्रीमुळे देखील अनन्या चर्चेत असते. दरम्यान, अनन्या विजय देवरकोंडा याच्या सह लाइजर सिनेमात झळकणार आहे. यापूर्वी 'खाली पीली' सिनेमात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची जोडी पाहायला मिळाली होती.