'मोगैंबो खुश हुआ': अमरीश पुरीची 87 वी जयंती- गुगलने साकारले अनोखे डूडल

प्रतिभावंत अभिनेते अमरीश पुरी यांच्या 87 व्या जयंती प्रित्यर्थ गूगलने एक अनोखे डूडल साकारून त्यांना मानवंदना दिली आहे.

Amrish Puri (Photo Credits: File Image)

Amrish Puri 87th Birth Anniversary: "जा सिमरन जा" , मोगैंबो खुश हुआ या सारख्या अनेक वाक्यांनी रसिकांच्या मनात अजरामर झालेले प्रतिभावंत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri 87th Birth Anniversary) यांची आज 87 वी जयंती आहे. याच प्रित्यर्थ गूगलने एक अनोखे डूडल (Google Doodle)  साकारून त्यांना मानवंदना दिली. अमरीश पुरी हे आपल्या भारदस्त आवाजामुळे बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. मात्र डीडीएलजे (DDLJ)  मधील त्यांनी साकारलेला प्रेमळ बाप देखील प्रेक्षकांच्या स्मरणात अजूनही कायम आहे. त्यामुळे आज त्यांच्या जयंती निमित्त साकारलेल्या या डूडल मध्ये गुगलने त्यांच्या याच सिनेमातील पात्रावरून प्रेरणा घेतलेली दिसून येतेय.

अमरिश पुरी यांनी 1967 ते 2005 या मोठ्या कालावधीत बॉलिवूडची इंडस्ट्री गाजवली असली तरी त्यांचा प्रादेशिक सिनेसृष्टीशी देखील खास संबंध आहे. करिअरच्या सुरवातीच्या काळात मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, पंजाबी, मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं होतं मात्र त्यांना सर्वाधिक यश हिंदी सिनेमातून मिळालं हे मात्र नक्की! आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोनदा हॉलिवूडच्या वाऱ्या देखील केल्या होत्या गांधी या सिनेमातला त्यांनी साकारलेला खान लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला. त्याचप्रमाणे स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या हॉलिवूडपटातही अमरिश पुरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

हे ही वाचा - महिला विश्वचषक २०१९ दिवस १ Google Doodle: पॅरिस मध्ये रंगणाऱ्या FIFA World Cup मधील पहिल्या सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल

ज्या काळात नायकाला पडद्यावर अधिक मागणी होती त्याच काळात अमरीश पुरी यांनी मिस्टर इंडिया, शेहनशाह , करण-अर्जुन, कोयला, दिलजले, विश्वात्मा, राम-लखन, तहलका, गदर, नायक, दामिनी यांसारख्या सिनेमातून व्हिलन साकारत रसिकांना भुरळ पाडली. सिनेसृष्टीतील त्यांचा दबदबा इतका होता की अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार या हिट जोडगोळीसोबत शक्ती या सिनेमात काम करत असताना सुद्धा अमरिश पुरी यांनीवठवलेली भूमिकाच अधिक भाव खाऊन गेली. अशा या प्रतिभावंत नटाने 2005 मध्ये काहीश्या आजारामुळे जगाच्या मंचावरून कायमची एग्झिट घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif