FIAF Award 2021: महानायक अमिताभ बच्चन ठरले 'एफआयएएफ पुरस्कार' मिळवणारे पहिले भारतीय; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

एफआयएएफ ही एक ना-नफा संस्था आहे, जी फिल्म निर्माता आणि आर्किव्हिस्ट शिवेंद्रसिंग डूंगरपुर यांनी स्थापित केली आहे.

Amitabh Bachchan received the FIAF Award 2021 (PC - Twitter)

FIAF Award 2021: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह अवॉर्ड्स 2021 (International Federation of Film Archives, FIAF) देण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात अमिताभ यांना हा सन्मान हॉलिवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कोर्सेसे आणि क्रिस्टोफर नोलन यांच्याकडून मिळाला. अमिताभ बच्चन हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अमिताभ यांच्यापूर्वी हा सन्मान कोणालाही मिळालेला नाही. एफआयएएफ कार्यक्रमात दरवर्षी चित्रपटाच्या जगाशी संबंधित लोकांचा सन्मान केला जातो.

अमिताभ बच्चन यांनी आपले काही छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. हे फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिलं की, 'मला 2021 FIAF पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा सन्मान मिळाल्याने खूप आनंद होत आहे. या कार्यक्रमात मला पुरस्कार दिल्याबद्दल एफआईएएफ, मार्टिन स्कॉर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन यांचे आभार. भारताचा चित्रपट वारसा वाचवण्याची आमची वचनबद्धता अटल आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आपले चित्रपट वाचविण्यासाठी देशव्यापी चळवळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत राहिल.' (वाचा - The Big Bull Trailer Release: अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांच्या 'द बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

दरम्यान, 78 वर्षीय बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ संलग्न फिल्म हेरिटेज फाउंडेशनने नामांकन दिले होते. एफआयएएफ ही एक ना-नफा संस्था आहे, जी फिल्म निर्माता आणि आर्किव्हिस्ट शिवेंद्रसिंग डूंगरपुर यांनी स्थापित केली आहे. एफआयएएफचे मुख्य उद्दीष्ट भारताच्या चित्रपटाचा वारसा जतन, जीर्णोद्धार, कागदपत्रे, प्रदर्शन आणि अभ्यास यासाठी काम करणे, हा आहे.

बिग बीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरचं ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र', 'झुंड' आणि 'मेडे' सारख्या चित्रपटातही दिसणार आहेत. यातील 'मेडे' हा अजय देवगन दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट आहे.