Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की संस्थेची विशेष जाहिरात, ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा वापरण्यात आला होता, ती दिशाभूल करणारी होती आणि चुकीची माहिती देते. अशा स्थितीत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी गुन्हा दाखल
Allu Arjun (Photo Credit - Twitter)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) यापूर्वी त्याच्या ‘पुष्पा’ या (Pushpa) चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटाला देशभरात चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटातील अल्लूचा अभिनय आणि धमाकेदार डान्स मूव्ह्सचे सर्वांनी कौतुक केले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अल्लु अर्जुन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने साऊथचा सुपरस्टार टीकेत आला आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की संस्थेची विशेष जाहिरात, ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा वापरण्यात आला होता, ती दिशाभूल करणारी होती आणि चुकीची माहिती देते. अशा स्थितीत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

अल्लू अर्जुन याने जाहिरातीत दिसल्याबद्दल आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच अल्लू अर्जुन आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांवर लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली. एखाद्या जाहिरातीमुळे अल्लुवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी अल्लू अर्जुनला फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी टीकेला सामोरे जावे लागले आहे. एवढेच नाही तर सरकारी परिवहन सेवेकडे दुर्लक्ष करून बाईक अॅपची जाहिरात केल्याप्रकरणीही त्यांना ताकीद देण्यात आली होती. (हे देखील वाचा: HIT Motion Poster: राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज)

वर्क फ्रंटवर, साऊथ सुपरस्टार शेवटचा त्याच्या पुष्पा द राइज चित्रपटात दिसला होता. दुसरीकडे, त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा: द रुल या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे वेणू श्रीराम सोबत आयकॉन आणि कोरटाला शिवा, एआर मुरुगाडोस, बोयापती श्रीनू आणि प्रशांत नील यांच्यासोबत प्रत्येकी एक चित्रपट आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2022 10:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).