'Rowdy Rathore' चा बनणार सिक्वेल, कोण असणार खिलाडी अक्षय कुमारची नायिका?

डायलॉग आणि अॅक्शन्सच्या जोरावर सुपरडुपर हिट ठरलेला चित्रपट राउडी राठौर (Rowdy Rathore)चा लवकरच सिक्वेल येणार आहे.

Rowdy Rathore (Photo Credits: Facebook)

डायलॉग आणि अॅक्शन्सच्या जोरावर सुपरडुपर हिट ठरलेला चित्रपट राउडी राठौर (Rowdy Rathore)चा लवकरच सिक्वेल येणार आहे. प्रभू देवा (Prabhu Deva) दिग्दर्शित या चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारने(Akshay Kumar) चोर आणि पोलिस असा डबलरोल केला होता. तर सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या चित्रपटात त्याची नायिका होती. या चित्रपटाची टीम तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आम्ही कथेवर काम करणेही सुरु केले आहे असे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबीना खान यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

तसेच त्या पुढेही असही म्हणाल्या की, आम्ही आता राउडी राठौर 2 ची कथा लिहत आहोत आणि ह्या चित्रपटात अक्षयकुमारच लीड अॅक्टर असेल अशी अपेक्षा करतो. या चित्रपटाचा पहिला पार्ट संजय लीला भन्साळी आणि शबीना खान यांनी मिळून केला होता.

फिल्म विषयी त्यांनी आणखी काही जास्त माहिती दिली नसली तरीही पुढील वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल असे सांगण्यात येतय. अक्षय कुमार एक असा अभिनेता जो कोणत्याही प्रकारची भूमिका अगदी सहजपणे करतो. त्यात त्याचे अभिनयाचे कौशल्य दिसून येते. त्यामुळे या कॉमेडी पटातही तो तितकीच धमाल करेल असे त्यांनी सांगितले.

Kesari Song Sanu Kehndi: केसरी सिनेमातील पंजाबी तडका असलेले 'सानू केंदी' गाणे रसिकांच्या भेटीला!

अक्षय कुमारच्या 'केसरी' (Kesari) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून सध्या तो सूर्यवंशी(Sooryavanshi) आणि गुड न्यूज (Good News)या चित्रपटावर काम करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif