Laxmmi Bomb Teaser: अक्षय कुमार ने शेअर केला लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा टीझर, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा (Watch Video)
अक्षय कुमार ने लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा टीझर (Laxmmi Bomb Teaser) शेअर करत येत्या दिवाळीत म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.
बॉलिवूड मध्ये राउडी राठोड, खिलाडी अशी दमदार ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) आपला पुढील सिनेमा म्हणजेच लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) मधुन एका अगदी अनोख्या भुमिकेत प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाची घोषणा झाल्यापासुनच अक्षय च्या चाहत्यांंमध्ये कमाल उत्सुकता आहे आणि आता अखेरीस ही प्रतिक्षा संपली असुन अक्षयने आपल्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच आपल्या सोशल मीडियावरुन अक्षयने लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा टीझर (Laxmmi Bomb Teaser) सुद्धा शेअर केला आहे. अक्षयचा हा नावाप्रमाणेच धमाकेदार असणारा सिनेमा येत्या दिवाळीत म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. अक्षय कुमार ने शेअर केला Laxmmi Bomb सिनेमातील त्याचा 'लक्ष्मी' अंदाज!
अक्षयने लक्ष्मी बॉम्बचा टीझर शेअर करताना येत्या दिवाळीत तुमच्या घरी लक्ष्मी सोबतच एक बॉम्ब सुद्धा येणार आहे त्यामुळे तयार राहा असं सांंगितलंय. टीझर मध्ये 'अब से तुम्हारा नाम लक्ष्मण नहींं लक्ष्मी होगा' असा एकच आवाज ऐकु येतोय आणि त्यातच अक्षयची दोन्ही लूक म्हणजे पुरुष आणि तृतीयपंथी रुप असे ट्रान्सफॉर्मेशन दाखवले आहे. या एकाच डायलॉग मध्ये आपण सिनेमाच्या कथानकाचा अंदाज लावु शकाल.
लक्ष्मी बॉम्ब टीझर
दरम्यान, हा सिनेमा जुन मध्येच प्रदर्शित व्हायचा होता मात्र कोरोनाच्या संंकटामुळे ही रिलीज डेट लांंबणीवर पडत गेली. आता अखेरीस 9 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांंना हा बहुप्रतिक्षित सिनेमा पाहायला मिळणार आहे. अक्षय च्या करिअर मधला हा एक मोठा प्रयोग म्हणता येईल या मध्ये अक्षय सोबत कियारा अडवाणी प्रमुख भुमिकेत दिसुन येणार आहे. तामिळ सिनेमा कंचना (Muni 2: Kanchana) चित्रपटाचा रिमेक आहे. राघव लॉरेन्स यांंनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.