Akshay Kumar Post On Son's Birthday: अक्षय कुमार चा लेक आरव झाला 18 वर्षांचा, 'हा' क्युट फोटो आणि भावुक कॅप्शन सह अक्षयने दिल्या शुभेच्छा
अक्षय कुमार (Akshay Kumar) चा लेक आरव याचा आज 18 वा वाढदिवस आहे, आपल्या लेकाचा हा खास दिवस संपत असताना अक्षयने एक गोड फोटो आणि तितकंच भावुक कॅप्शन देत दिवसाचा शेवट गोड केला आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) चा लेक आरव याचा आज 18 वा वाढदिवस आहे, आपल्या लेकाचा हा खास दिवस संपत असताना अक्षयने एक गोड फोटो आणि तितकंच भावुक कॅप्शन देत दिवसाचा शेवट गोड केला आहे. बाहेर जगासाठी राउडी म्हणुन ओळखला जाणारा एक अक्षय आणि हे कॅप्शन लिहिताना त्यात या हिरो पलिकडचा एक बाप हा फरक अगदी प्रकर्षाने दिसुन येतोय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर आणि अक्षय च्या सर्व फॅन पेज वर तुफान व्हायरल होत आहे. अक्षयने शेअर केलेल्या या फोटोवर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सह अन्य कलाकारांंनी सुद्धा कमेंट करत आरव ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Akshay Kumar Drinks Cow Urine Every Day: अक्षय कुमार 'दररोज पितो गोमूत्र', Bear Grylls सोबतच्या Live Chat मध्ये खुलासा (Watch Video)
अक्षय ने आपल्या पोस्ट मध्ये काय म्हंटलंय ते पाहुन कदाचित तुमच्याही डोळ्याच्या कडा ओलावतील, तर अक्षय म्हणतो, "हा दिवस आला यावर विश्वास ठेवू शकत नाही माझ्या मुलाला 18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !! तु लहान होतास तेव्हासारखाच आता सुद्धा मी तुला माझ्या कुशीत धरुन ठेवणार आहे, अगदी तोपर्यंत जोपर्यंत तु मला तुझ्या हातात उचलुन घ्यायचा दिवस येईल. आता तू माझ्यापेक्षा उंच आहेस, माझ्यापेक्षा देखणा आहेस,तुझंं मन माझ्या पेक्षा 10 पट मोठं आहे. तु या जगात असल्याने जगाचाच खुप फायदा होत आहे, तुला माझंं खुप प्रेम आणि शुभेच्छा!
अक्षय कुमार Instagram
दरम्यान आरव ची आई म्हणजेच ट्विंंकल खन्ना ने सुद्धा अशीच पोस्ट करुन आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुझंं लहानपण नक्कीच मिस करतेय पण तु जसा मोठा झालायसं मला त्याचा अभिमान आहे अशी पोस्ट ट्विंंकलने सुद्धा केली आहे.
ट्विंंकल खन्ना पोस्ट
दरम्यान अक्षय सध्या पत्नी आणि मुलांंसोबत स्कॉटलॅंंड मध्ये आहे, आज आरव च्या वाढदिवशी सुद्धा अक्षय आणि कुटुंंबाने स्कॉटलॅंड मध्ये घरगुतीच पण जोरदार सेलिब्रेशन केलं होतं.