Ajay Devgn-Kajol Son Yug's Birthday: अजय देवगन आणि काजोल ने मुलगा युग च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करुन दिल्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा

दुसरीकडे काजोल ने युग स्विमिंग करतानाचा एक स्लो मो व्हिडिओ शेअर केला आहे. 'मला काहीच माहित नाही. मला सर्व माहिती आहे. युग देवगन माझ्या छोट्या बुद्धाला 10 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असे म्हटले आहे.

Ajay Devgn and Kajo Son Yug (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील क्युट कपल्स मधील एक गोडजोडी म्हणजे अजय देवगण-काजोल (Ajay Devgn-Kajol). हे दोघेही आपल्या सोशल अकाउंटद्वारे आपल्या चाहत्यांशी जोडलेले राहतात. आपल्या कुटूंबासोबत घालवलेले क्षण देखील ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आज त्यांचा मुलगा युगचा (Yug) चा 10 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात युग रोपं लावताना दिसत आहे. युगचा हा उपक्रम पाहून त्याचे आईवडिल म्हणून अजय आणि काजोल ला खूप गर्व वाटतो आहे. म्हणूनच त्यांनी सोशल मिडियावर याबाबात पोस्ट करत युगचे कौतुक केले आहे.

अजय देवगण ने शेअर केलेल्या या पोस्ट युग झाडं लावताना दिसत आहे. यावर पोस्टखाली 'निसर्गाच्या दृष्टीने उद्याच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल. यापेक्षा जास्त मागू शकत नाही. हॅप्पी बर्थडे युग' असे म्हटले आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Working towards a Green tomorrow. Cannot ask for more. Happy Birthday 🥳 Yug. And, lots more to come.

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

तर दुसरीकडे काजोल ने युग स्विमिंग करतानाचा एक स्लो मो व्हिडिओ शेअर केला आहे. 'मला काहीच माहित नाही. मला सर्व माहिती आहे. युग देवगन माझ्या छोट्या बुद्धाला 10 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असे म्हटले आहे. काजोल चे इंस्टाग्राम अकाऊंटवर 1 कोटी फॉलोअर्स; हटके स्टाईलमध्ये मानले चाहत्यांचे आभार (Watch Video)

 

View this post on Instagram

 

“I know nothing I know everything “- Yug Devgan Happy 10th birthday to my little Buddha . Miss u more than I can say.

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

अलीकडेच काजोलचे इंस्टाग्रामवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स पूर्ण झाल्याने तिने चाहत्यांचे हटके स्टाईलमध्ये आभार मानले आहेत. या आनंदाचे सेलिब्रेशन आणि चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी काजोलने 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham) सिनेमातील एक डान्स सीन शेअर केला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now