अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांचे दुःखद निधन
अजय देवगण याचे वडील वीरू देवगण यांना आज सकाळी देवाज्ञा झाली असून संध्याकाळी 6 च्या सुमारास विलेपार्ले स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अजय देवगण (Ajay Devgan) याचे वडील वीरू देवगण (Veeru Devgan) यांना आज देवाज्ञा झाली आहे. वीरू हे बॉलिवूड मध्ये साहसी सिनेमांचे दिगरदर्शक म्हणून प्रसिद्ध होते. मागील काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत खालावली होती आज, म्हणजेच सोमवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येतील.
ANI ट्विट
याबाबत माहिती देत चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी सकाळी एक ट्विट केले होती, ज्यात त्यांनी वीरू हे एक ख्यातनाम दिग्दर्शक असून त्यांनी अमिताभ बच्चन व अजय देवगण यांच्या सोबत हिंदुस्थान की कसं या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन केले होते, असे म्हणत वीरू यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
तरण आदर्श ट्विट
वीरू देवगण यांनी लाल बादशाह , इश्क फूल और कांटे यांसारख्या चित्रपटांसाठी ऍक्शन दिगदर्शक म्हणून काम केले होते.