Hema Malini आणि Dharmendra यांची मुलगी अहाना ने दिला जुळ्या मुलींना दिला जन्म, पती वैभव वोहरा ने चिमुकलींची ठेवली 'ही' नावे
अहानाने याबाबत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली असून आपल्या स्टेटसला या मुलींची नावे देखील शेअर केली आहेत. या जुळ्या मुलींची नावे आहेत 'अस्त्रिया' आणि 'आदिया'.
बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी पुन्हा एकदा आजी-आजोबा बनले आहेत. यांची धाकटी मुलगी अहाना ने जुळ्या मुलींना जन्म दिला असून अहाना ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. मुली आणि आई या दोघींची प्रकृती उत्तम असल्याचे रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देओल आजी-आजोबा दोन गोंडस मुलींचे आजी-आजोबा झाल्याने आनंदित असून अहानाचे सासरीची मंडळी देखील खूश आहेत. अहानाचे पती वैभव वोहरा या दोन जुळ्या मुलींची नावे देखील ठेवली आहे.
अहानाने याबाबत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली असून आपल्या स्टेटसला या मुलींची नावे देखील शेअर केली आहेत. या जुळ्या मुलींची नावे आहेत 'अस्त्रिया' आणि 'आदिया'.हेदेखील वाचा- Aamir Khan ची मुलगी Ira Khan आपल्या फिटनेस कोचच्या प्रेमात? (See Pics)

अहाना आणि वैभव यांचे लग्न 2 फेब्रुवारी 2014 साली झाले होते. या दोघांना 2015 मध्ये मुलगा झाला होता. ज्याचे नाव दारेन वोहरा आहे आणि आता या जोडप्याला जुळ्या मुली झाल्याने माता-पिता बनलेले अहाना आणि वैभव देखील प्रचंड खूश आहेत.
अहाना आपली मोठी बहिण ईशा देओल प्रमाणे चित्रपटात काम केले नाही. मात्र संजय लीला भन्सालींच्या गुजारिश चित्रपटात असिस्ंटट म्हणून काम केले होते. मात्र आपल्या देओल कुटूंबाप्रमाणे ती या इंडस्ट्रीत न जाता यापासून थोडी दूरच राहिली.
अहाना ची मोठी बहिण ईशाला जून 2019 मध्ये दुसरी मुलगी झाली. त्यानंतर आता अहानाला झालेल्या जुळ्या मुली ही बातमी चाहत्यांसाठी तितकीच आनंदाची आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2020 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

