Tanuja Health Update: अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

दरम्यान तनुजा यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडीयात लवकरात लवकर प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना सुरू केली आहे.

Kajol's Mom Actress Tanuja (PC - Twitter/@FilmyMonkey)

अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 80 वर्षीय अभिनेत्री प्रकृती अवस्थ्यामुळे रविवार (17 डिसेंबर) सकाळी  जुहूच्या एका हॉस्पिटल मध्ये दाखल होत्या. त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार होते. पण आता त्यांचे हेल्थ पॅरॅमिटर नियंत्रणात असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी  देण्यात आली आहे. तनुजा यांनी आपल्या अदाकारीने हिंदी रूपेरी पडदा गाजवला आहे. तसेच त्यांनी मराठी,बंगाली  सिनेमांमध्येही काम केले आहे. मागील काही वर्षांपासून त्या सिनेसृष्टीपासून दूर गेल्या आहेत.

तनुजा या अभिनेत्री नूतन यांच्या बहिण तर काजोल यांची आई आहे. 1950 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आहे. 'हमारी बेटी' हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. यानंतर त्यांनी 'ज्वेल थिफ', 'हाथी मेरे साथी', 'मेरे जीवनसाथी' सारखे सिनेमे गाजवले आहेत. आरंभ, जुनून सारख्या टेलिव्हिजन शो मध्येही त्यांनी काम केले आहे.

शोभना समर्थ आणि कुमार सेन समर्थ यांची कन्या अभिनेत्री तनुजा   नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत दिसल्या होत्या. भूमिकेला न्याय देण्यासाठी तेव्हा त्यांनी संपूर्ण केशवपन केले होते. नक्की वाचा: Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने दिले अभिनेत्याच्या प्रकृतीसंदर्भात 'हे' अपडेट .

दरम्यान तनुजा यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडीयात लवकरात लवकर प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना सुरू केली आहे.