अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांना झालाय डायव्हर्टिक्युलायटीस हा दुर्मिळ आजार...पाहा या आजाराची लक्षणे
तनुजा यांना डायव्हर्टिक्युलायटीस हा आजार झाल्याचे सांगण्यात येतेय.
आपल्या सास-यांच्या निधनाच्या दु:खातून सावरते ना सावरते तोच अभिनेत्री काजोलला (Kajol) आपल्या आईसाठी हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून काजोलची आई तनुजा (Tanuja) यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे याचे नेमकं कारण मात्र समजू शकले नव्हते. मात्र बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार, तनुजा यांना डायव्हर्टिक्युलायटीस (Diverticulitis) हा आजार झाल्याचे सांगण्यात येतेय. ह्या आजारावर इलाज करण्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच नुकतीच त्यांच्यावर एक सर्जरी देखील करण्यात आली .
काजोलचा इन्स्टावरील फोटो पाहून सर्व चाहत्यांनी वेगवेगळे कमेंट्स करुन काजोलकडे विचारपूस केली. त्यावेळी काजोलची आई तनुजा हॉस्पीटलमध्ये असल्याचे समोर आले होते. डायव्हर्टिक्युलायटीस हा आजार पोटाशी संबंधित आहे. गेल्या महिन्यात देखील तनुजा यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
डायव्हर्टिक्युलायटीस हा आजार सहसा शरीरात फायबरची कमतरता असल्यामुळे आणि उतारवयामुळे होतो. कधी कधी यासाठी आनुवंशिक कारणही जबाबदार असू शकते. डायव्हर्टिक्युलायटीसमध्ये आतड्यांच्या आवरणाच्या कमकुवत भागावर लहान पॉकेट्स म्हणजे डायव्हर्टिक्युला तयार होतात आणि ते सुजतात. परिणामी संसर्ग येतो आणि फोड येतात.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.