अभिनेत्री Gayatri Joshi आणि Vikas Oberoi इटलीमधील रस्ते अपघातातून थोडक्यात बचावले

या सुखरुप असल्या तरी अपघाताच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या स्वदेस चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे त्या अधिक चर्चेत आल्या होत्या. पती विवेक ओबेरॉय यांच्यासोबत त्या आलिशान लिंबोर्गिनी कारणे प्रवास करत होत्या.

GayaJoshi and Vikas Oberoi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Gayatri Joshi Road Accident News: इटली येथे झालेल्या अपघातात अभिनेत्री गायत्री जोशी थोडक्यात बचावल्या आहेत. या सुखरुप असल्या तरी अपघाताच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या स्वदेस चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे त्या अधिक चर्चेत आल्या होत्या. पती विवेक ओबेरॉय यांच्यासोबत त्या आलिशान लिंबोर्गिनी कारणे प्रवास करत होत्या. पुढे असलेल्या फरारी कारला ओव्हरटेक करताना त्यांच्या कारला अचानक आगल लागली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातातून दोघेही सुखरुप बचावले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

इटलीतील सार्डिनिया येथील सार्डिनिया सुपरकार टूर दरम्यान हा अपघात झाला. हे जोडपे तेउलाडा ते ओल्बियापर्यंत लक्झरी कार प्रवास करत होते.. विविध वृत्त पोर्टल्सच्या वृत्तानुसार, हा अपघात म्हणजे विविध वाहनांची एकमेकांना बसलेली धडक होती. त्यातून पहिल्यांदा एका कारला आग लागली. जे स्विस जोडपे चालवत होते. ज्याचा फटका जोशी यांच्या कारालाही भसला. अपघातानंतर गायत्रीने एफपीजेला सांगितले की “विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. इथे आमचा अपघात झाला.. देवाच्या कृपेने आम्ही दोघेही पूर्णपणे सुखरुप.

अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मोठ्या पांढऱ्या व्हॅनचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात अनेक कार रस्त्यावर जोरात धावताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

ट्विट

गायत्री आणि विकास दोघेही आपला सर्वाधिक वेळ विदेशात घालवतात. या जोडप्याने 2005 मध्ये लग्न केले. विकास हे ओबेरॉय कन्स्ट्रक्शन या देशातील सर्वात प्रमुख बांधकाम व्यवसायाचे प्रमुख आहेत. हे दोघे अनेकदा त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांसह सोनाली बेंद्रे, हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्यासह हँग आउट करताना दिसतात. गायत्रीने शाहरुख खानसोबत 2004 मध्ये स्वदेस हा चित्रपट मिळवण्याआधी, 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनात काम केल्यानंतर, तिने तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंडस्ट्री सोडली. तिला विकाससोबत दोन मुले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif