Bollywood Drugs Case: अभिनेत्री दीपिका पादुकोण पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर NCB कार्यालयातून बाहेर पडली, ड्रग्ज प्रकरणाबाबत झाली चौकशी

सकाळी पावणे दहाच्या आसपास NCB कार्यालयात आलेली दीपिका पादुकोण तब्बल साडे पाच तासांच्या चौकशीनंतर 3 वाजता या कार्यालयातून बाहेर पडली.

Deepika Padukone at NCB (Photo Credits: Yogen Shah)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी (Sushant Singh Rajput Case) NCB ने सुरु झालेल्या चौकशीने आता वेगळच वळण घेत या प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण जोर धरू लागले आहे. या प्रकरणी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या सुप्रसिद्ध अभिनेत्रींची नावे देखील समोर आली आहे. यांना NCB कडून समन्स पाठविल्यानंतर आज त्यांनी मुंबईच्या NCB कार्यालयात हजेरी लावली. यात सकाळी पावणे दहाच्या आसपास NCB कार्यालयात आलेली दीपिका पादुकोण तब्बल पाच तासांच्या चौकशीनंतर 3 वाजता या कार्यालयातून बाहेर पडली.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास ड्रग्सच्या दिशेने सुरु झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे मोठे नावं समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दीपिका पादुकोण हिला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावला आहे, दरम्यान, दीपिका पादुकोण शकुन बत्रा याच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्यात होती. त्यानंतर ती गुरुवारी मुंबईत आल्यानंतर आज NCB कार्यालयात चौकशी करिता आली. Bollywood Drugs Case: एनसीबी चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण सह रणवीर सिंह राहणार हजर? NCB ने केले स्पष्ट

दरम्यान PeepingMoon.com च्या पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, एनसीबीकडून होणाऱ्या दीपिकाच्या चौकशीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, असे पत्र रणवीर सिंह याने NCB ला लिहिले होते. चौकशी दरम्यान दीपिकाला पॅनिक अॅटक येऊ शकतो या भीतीपोटी रणवीरने ही विनंती केली होती. कायद्यानुसार, तो दीपिकासोबत उपस्थित राहू शकत नाही याची कल्पना असूनही दीपिकाच्या काळजीपोटी त्याने ही विनंती केली होती. परंतु, अपडेट्सनुसार, NCB ला रणवीर सिंह कडून अशा कोणत्याही प्रकारचे पत्र मिळालेले नसल्याचे समोर येत आहे.

दीपिका पादुकोणसह अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची देखील आज चौकशी झाली.