67th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; दोन चित्रपटांसाठी Kangana Ranaut ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; सुशांत सिंग राजपूतचा Chhichhore ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट (Full Winners List)

यावर्षी एकूण 461 फिचर चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकित झाले होते. यावर्षी 13 राज्यांनी ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ प्रकारात भाग घेतला. हा पुरस्कार सिक्कीमला देण्यात आला आहे

Chhichhore (Photo Credits-Twitter)

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा झाली आहे. हा पुरस्कार सोहळा आज म्हणजेच सोमवारी पार पडला. कोरोना विषाणूच्या साथीमुळे या सोहळ्याला वर्षभर उशीर झाला. दरवर्षी 3 मे रोजी पार पडणारा हा सोहळा आज राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2019 मध्ये तयार झालेल्या चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले आहेत. यावर्षी एकूण 461 फिचर चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकित झाले होते. यावर्षी 13 राज्यांनी ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ प्रकारात भाग घेतला. हा पुरस्कार सिक्कीमला देण्यात आला आहे. यंदा सुशांतसिंग राजपूत स्टारर ‘छिछोरे’ (Chhichhore) चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

असे आहेत पुरस्कार:

Non-Feature Film Awards -

Feature Film Awards:

दरम्यान, 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनाशी लढण्यात गेल्याने मागच्यावर्षी पुरस्कारांची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे आज 2019 मध्ये बनलेल्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे.