1962: The War in the Hills: सैराट फेम आकाश ठोसर साकारणार आपला 'ड्रिम रोल'; महेश मांजरेकर दिग्दर्शित Disney+ Hotstar च्या सिरीजमध्ये मिळाली महत्वाची भूमिका

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सैन्यात निवड होण्याकरिता मी दोनदा परीक्षा दिल्या होत्या. फक्त लष्करी अधिकारीच नाही तर मी पोलिस सेवेत दाखल होण्याचाही प्रयत्न केला होता. आज जर का मी अभिनेता नसतो तर माझी कारकीर्दी ही आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्यात घडली असती.

Aakash Thosar (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठी चित्रपट सैराटमुळे रातोरात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर (Akash Thosar). सध्या रिंकू मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आहे, त्याचसोबत आकाशही चित्रपट सृष्टीमध्ये उत्तम भूमिकांसह आपेल पाय रोवताना दिसत आहे. आता आकाश डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) ची सिरीज '1962: द वॉर इन द हिल्‍स' (1962: The War in the Hills) मध्ये दिसणार आहे. मेकर्सनी मंगळवारी या गोष्टीची माहिती दिली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ही सिरीज 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे.

अभय देओलची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज नोव्हेंबर 1962 मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यावेळी 125 भारतीयांची फौज 3,000 चिनी सैन्याविरुद्ध उभी ठाकली होती. अशा प्रकारे या सिरीजमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याची कथा दाखवली जाणार आहे. आकाश ठोसर या सिरीजमध्ये 'किशन' नावाची भूमिका सकारात आहे. किशन हा मेजर सूरज सिंग यांच्या नेतृत्वातील बटालियनचा एक भाग आहे. 26 वर्षीय आकाश ठोसरने याआधी नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज' मध्ये भूमिका साकारली होती. आता आकाशने सांगितले की, '1962: द वॉर इन द हिल्‍स' मधील ही भूमिका त्याच्यासाठी ड्रिम रोल होता. (हेही वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे पडली प्रेमात? अफेअरच्या चर्चा रंगू लागल्यानंतर डिलीट केली 'ती' भावनिक पोस्ट)

याबाबत बोलताना आकाश म्हणाला, ‘मी लहान असल्यापासून भारतीय सैन्यात भरती होण्याचे माझे स्वप्न होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सैन्यात निवड होण्याकरिता मी दोनदा परीक्षा दिल्या होत्या. फक्त लष्करी अधिकारीच नाही तर मी पोलिस सेवेत दाखल होण्याचाही प्रयत्न केला होता. आज जर का मी अभिनेता नसतो तर माझी कारकीर्दी ही आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्यात घडली असती.’ आता आपण एका सैनिकाचा रोल सकारात असल्याचा आनंद असल्याचे मत आकाशने व्यक्त केले आहे. ‘1962: द वॉर इन द हिल्स’चा प्रीमियर 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.