'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करण्याची भाजपची मागणी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असणारा 'ठाकरे' सिनेमा करमुक्त करावी, अशी मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने केली आहे.

Thackeray Movie (Photo Credits: Twitter)

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असणारा 'ठाकरे' सिनेमा (Thackeray Movie) करमुक्त करावा, अशी मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने केली आहे. यासंदर्भातले पत्र भाजप चित्रपट आघाडीने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.

ठाकरे सिनेमा मनोरंजन कर मुक्त व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली असून मागणीचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासनही विनोद तावडे यांनी दिलं आहे.

सध्या भाजप-शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीयेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील युतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळेच शिवनेसनेला गोंजारण्यासाठी भाजपाचे हे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बाळ ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री अमृता राव हिने मीनाताई ठाकरेंची भूमिका साकरली आहे. ट्रेलरमुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली असून हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.