Bigg Boss Marathi 5 Contestant Fee: बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं मानधन किती? सर्वात महागडा स्पर्धक कोण? घ्या जाणून
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझमध्ये दमदार मराठी कलाकारांची फौज आहे. वर्षा उसगावकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत अशी नामांकीत मंडळी बीग बॉसच्या घरात आहेत. जाणून घेऊयात सर्वात महागडा स्पर्धक कोणता आहे.
Bigg Boss Marathi 5 Contestant Fee: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) यंदाच्या सीझनमध्ये मोठे सेलिब्रिटी सामील झाले आहेत. सोशल मीडिया एन्फ्लुएंसरही बिग बॉसच्या घरात सामील झाले आहेत. मोठे कलाकार आणि नवोदित कलाकारांमधील भांडणं गेल्या दोन आठवड्यात पहायला मिळाली. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीची वर्षा उसगांवकर सोबतचा राडा, नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशनदेखील पाहायला मिळालं. दुसरा आठवडा जान्हवी किल्लेकरने गाजवला. दरम्यान असं असलं तरीही कोणाला सर्वात जास्त मानधन (Bigg Boss Marathi 5 Contestant Fee)मिळत आहे. हे अजून काही प्रेक्षकांना माहित नाही. महागड्या स्पर्धकांच्या यादीत वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी)
वर्षा उसगांवकर यांची कमाई किती?
मीडिया रिपोर्नुसार, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांमध्ये वर्षा उसगांवकर यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला 2.50 लाख रुपये मानधन मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे सर्वात जास्त दिलं जाणार माधन नाही. त्यामुळे वर्षा उसगावकरांव्यतिरीक्त आणखी एक स्पर्धक आहे. जो त्यांच्यापेक्षा जास्त मानधन आकारत आहे. यानंतर स्प्लिट्सविला फेम अरबाज पटेल दर आठवड्याला 1.25 लाख रुपये फी घेत आहे.
पुरुषोत्तम दादा पाटील यांना एका आठवड्यासाठी 1.35 लाख
बिग बॉसच्या घरात पुरुषोत्तम दादा पाटील यांना एका आठवड्यासाठी 1.35 लाख रुपये आकारले गेले. तर, सूरज चव्हाण याला एका आठवड्यासाठी फक्त 25 हजार मानधन दिलं जात आहे. धनश्याम दरोडे याला 50 हजार, धनंजय पोवार 60 हजार मानधन घेत आहे. उर्वरित स्पर्धक वैभव चव्हाण दर आठवड्याला 70 हजार रुपये घेत आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक-एक लाख रुपये कमावत आहेत. निखिल दामले 1.25 लाख कमावत आहे. तर, पॅडी कांबळे 2 लाख कमावत असल्याचं बोललं जात आहे.
निक्की तांबोळी सर्वात महागडी स्पर्धक
लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना मागे टाकत निक्की तांबोळी हिने पाचव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये फी आकारली आहे. त्यामुळे ती यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनली आहे. तिच्या पाठोपाठ गायक अभिजीत सावंत दुसरा सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे. अभिजीत सावंत दर आठवड्याला 3.50 लाख रुपये मानधन घेतले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 9973 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

