अभिनेता Ranbir Kapoor 'प्रभू राम' ची भूमिका उत्तम पद्धतीने साकारणार- Arun Govil

दिग्दर्शक नितीश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Arun Govil

Arun Govil Praises Ranbir Kapoor's Portrayal of Ram:  टीव्हीवर राम हे पात्र अजरामर करणाऱ्या अरुण गोविलने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर साकारणाऱ्या  'प्रभू राम'  च्या भुमिकेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक नितीश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूर संदीप वंगा रेड्डी यांच्या ॲनिमल चित्रपटात दिसला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.

अरुण गोविल म्हणाले, "रणबीर कपूर हा एक चांगला अभिनेता आहे आणि त्याच्याकडे बघून असे वाटते की त्याच्याकडे मूल्ये आहेत." ते पुढे म्हणाले, "रामच्या भूमिकेत तो कितपत यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल, पण मला विश्वास आहे की, तो सर्वोत्तम अभिनय करेल." रणबीर कपूर साकारणाऱ्या  'प्रभू राम' च्या भूमिकेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक रणबीरचे कौतुक करत आहेत, तर काही लोक त्याला या व्यक्तिरेखेसाठी अयोग्य म्हणत आहेत.

नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. रावण. लक्ष्मण या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.