#MeToo : लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले

नाना पाटेकर आणि साजिद खान या दोघांनंतर या यादीमध्ये आता गायक-संगीतकार अनु मलिकचेही नाव सामील झाले आहे.

अनु मालिक (Photo Credits: Instagram)

#MeToo चळवळी अंतर्गत ज्या लोकांवर आरोप झाले आहेत त्यांच्या स्वतःच्या इमेज सोबतच अशा लोकांचे करिअर देखील धोक्यात आले आहे. नाना पाटेकर आणि साजिद खान या दोघांनंतर या यादीमध्ये आता गायक-संगीतकार अनु मलिकचेही नाव सामील झाले आहे. अनु मलिकवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून त्यांना ‘इंडियन आयडॉल 10’च्या परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या अनु मलिक यांच्या सोबत विशाल ददलानी आणि नेहा कक्कर परीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र आता अनु मलिक यांच्या जागी इंडस्ट्रीमधील नावाजलेले नाव परीक्षकाची भूमिका निभावेल. शोच्या एपिसोडप्रमाणे हे परीक्षकही बदलले जातील, असे सोनीकडून सांगण्यात आले आहे.

दोन प्रसिद्ध गायीकेंसोबतच इतर दोन महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोनी टीव्ही आणि अनु मलिक यांच्यामध्ये होणाऱ्या करारावर काम चालू होते. मात्र आता परिस्थिती चिघळल्यानंतर, पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. त्याचप्रमाणे अनू मलिक यांच्या पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे.

1990मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनु मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप एका लोकप्रिय गायिकेने केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif