Amruta Fadnavis यांचे व्हॅलेंटाईन डे निमित्त 'ये नयन डरे डरे' गाणे प्रदर्शित, Watch Video

या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. ये नयन डरे डरे हे हिंदी गाणे असून यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते.

Amruta Fadnavis यांचे व्हॅलेंटाईन डे निमित्त 'ये नयन डरे डरे' गाणे प्रदर्शित, Watch Video
Amruta Fadnavis New Song (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपल्यातील सुप्त कलागुणांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. कधी आपल्या गाण्याने तर कधी आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे... त्यांच्या गाण्याने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केलेल्या अमृता फडणवीसांनी नुकतेच आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे आणले आहे. व्हलेंटाईन डे च्या निमित्ताने हे गाणे युट्यूबव प्रदर्शित झाले. 'ये नयन डरे डरे' (Ye Nayan Dare Dare) असे या गाण्याचे बोल आहेत. सुंदर अशा समुद्रकिनारी हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. ये नयन डरे डरे हे हिंदी गाणे असून यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते.हेदेखील वाचा- Ratris Khel Chale 3 Teaser: सावधान! अण्णा नाईक परत येतायत, 'रात्रीस खेळ चाले 3' चा भयभीत करणारा टीजर आला समोर, Watch Video

Watch Video

हे गाणे आशिष पांडा यांनी दिग्दर्शित केले असून भारत गोयल यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

अमृता फडणवीस यांचे राजकीय मुद्द्यांवर वा एखाद्या व्हायरल मुद्द्यावर केलेली टिका-टिप्पणी देखील सोशल मिडियावर चर्चेचा विषय असते. त्यामुळे अनेकदा त्या वादात देखील अडकल्या आहेत. मात्र त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सडेतोड वक्तव्य करणे काही सोडले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2021 11:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).