Jolly LLB 3: अभिनेत्री अमृता रावचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन; जॉली एलएलबी 3 चित्रपटात साकारणार अर्शद वारसीच्या पत्नीची भुमीका
अभिनेत्री जॉली एलएलबी 3 मध्ये संध्याच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे.
Jolly LLB 3: अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि हुमा कुरेशी त्यांचा आगामी चित्रपट जॉली एलएलबी 3 द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित, लोकप्रिय ठरलेल्या कोर्टरूम ड्रामाचा हा भाग तिसरा भाग असणार आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्री अमृता राव जॉली एलएलबी 3 च्या कलाकारांमध्ये सामील होणार आहे.अर्शद वारसीसोबत चित्रपटाच्या पहिल्या भागात संध्याची भूमिका साकारणारी अमृता राव आगामी भागात तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
"जॉली एलएलबी 3 मध्ये अमृता अर्शदची पत्नी म्हणून भूमीका साकारत आहे. चित्रपटात तिच्या एंट्रीमुळे, जॉली एलएलबी 1, 2 चे कलाकार तिसऱ्या भागात दिसणार का अशी चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे काही शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे.
सध्या चित्रपटाची टीम मुंबईत शूटिंग करत आहे. त्यानंतर पुढचे शूटींग दिल्लीत होणार आहे. अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांनी 2017 च्या जॉली एलएलबी 2 चित्रपटात काम केले होते. जो 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्शद वारसीच्या जॉली एलएलबीचा सीक्वल होता. जॉली एलएलबी 3 2025 मध्ये रिलीज होणार आहे.