Heropanti 2 Trailer: अहमद खान दिग्दर्शित 'Heropanti 2'चा ट्रेलर प्रदर्शित, टायगर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत
या चित्रपटात नवाज एका मोठ्या गँगस्टरच्या भूमिकेत आहे. तर टायगर म्हणजे बबलू या व्यक्तिरेखेच्या भुमिकेत आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) पुन्हा एकदा 'हीरोपंती' (Heropanti) चित्रपटासाठी पडद्यावर सज्ज झाला आहे. 'हिरोपंती 2' (Heropanti 2) या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना त्याची एक झलक पाहण्याची उत्सुकता होती आणि अखेर त्यांची प्रतीक्षा संपली कारण चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) व्यक्तिरेखा खूपच रोमांचक दिसत आहे. त्यासोबतच टायगर पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, तारा सुतारियाची स्टाईल खुप छान दाखवली आहे. चाहत्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज 17 मार्च रोजी ‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील लैलाची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जबरदस्त अभिनयाने ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात नवाज एका मोठ्या गँगस्टरच्या भूमिकेत आहे. तर टायगर म्हणजे बबलू या व्यक्तिरेखेच्या भुमिकेत आहे.
एप्रिलमध्ये होणार प्रदर्शित
हा चित्रपट टायगर श्रॉफच्या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या डेब्यू चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामधून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यावेळी तारा सुतारिया या चित्रपटात दिसत आहे. तर क्रिती सेनन पहिल्या भागात या चित्रपटाचा एक भाग होती. साजिद नाडियादवाला निर्मित 'हीरोपंती 2' हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OTT प्लॅटफॉर्म Amazon ने Heropanti 2 चे पोस्ट थिएटर राइट्स विकत घेतले आहेत. (हे देखील वाचा: सलमान खान करणार तेलुगु चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण; सुपरस्टार Chiranjeevi च्या Godfather चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका)
अहमद खानने केले दिग्दर्शन
अहमद खान यांनी या रोमँटिक अॅक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अहमद खानने यापूर्वी 'बागी 2' आणि 'बागी 3' मध्ये टायगरचे दिग्दर्शन केले आहे. टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांच्याशिवाय या चित्रपटात अमृता सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात संगीत ए आर रहमानचे आहे, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर खूपच रंजक दिसत असल्याने संपूर्ण चित्रपट तितकाच रंजक आहे की नाही हे पाहावे लागेल.