Aani Kay Hava Trailer: 7 वर्षानंतर प्रिया बापट-उमेश कामत वेबसीरजमध्ये दिसणार एकत्र

ही जोडी लवकरच 'आणि काय हवं?' (Aani Kay Hava) या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya Bapat and Umesh Kamat (Photo Credits: Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सर्वात लाडकी जोडी प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) 7 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. ही जोडी लवकरच 'आणि काय हवं?' (Aani Kay Hava) या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही या जोडीची पहिलीच वेबसिरीज असल्यामुळे प्रिया आणि उमेश खूपच एक्सायटेड आहेत. नुकताच या वेब सिरिजचा ट्रेलर समोर आला आहे. प्रिया ने आपलाय सोशल अकाउंटवरुन हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

प्रियाने हा ट्रेलर आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करुन त्याखाली 'लऽऽऽऽऽय excited!' असं लिहिले आहे.

हा ट्रेलर पाहून या जोडीच्या चाहत्यांनी प्रिया आणि उमेशचे भरभरुन कौतुक केले आहे. प्रिया आणि उमेश या जोडीला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळत असते. 'टाइमप्लीज' चित्रपटाच्या नंतर तब्बल 7 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र भूमिका दिसणार यांचे चाहतेही या वेबसिरीजला घेऊन खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा- City Of Dreams मध्ये प्रिया बापट चा बोल्ड अंदाज, Lesbian Kissing Scene वरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियाने दिले चोख उत्तर

याआधी प्रिया बापट 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. मात्र उमेश कामत 'आणि काय हवं?...' या वेबसीरीजमधून पदार्पण करत आहे. 16 जुलै पासून ही वेबसिरीज सुरु होणार असून एमएक्स प्लेअर वर ही वेबसिरिज मोफत पाहायला मिळेल.