Kalyani Kurale Jadhav Dies: तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, कलाविश्वावर पसरली शोककळा

त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

kalyani kurale jadhav (PC - Facebook)

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhyat Jeev Rangla) फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव (kalyani kurale jadhav) यांचं कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झाले आहे. कल्याणी जाधव यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव यांनी ‘प्रेमाची भाकरी’ नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. हेही वाचा Pune Crime: किळसवाणे कृत्य ! प्रियकर सोबत रहावा म्हणून आईनेच 15 वर्षीय मुलीचे तरुणाशी लावले लग्न, दोघांना अटक

कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.