Arvind Joshi Passes Away: प्रख्यात गुजरात अभिनेते, Sharman Joshi चे वडील अरविंद जोशी यांचे निधन

मीडीया रिपोर्ट्सनुसार, अरविंद जोशी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Arvind Joshi Dies at 84 (Photo Credits: Twitter)

प्रसिद्ध गुजराती अभिनेते आणि बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) याचे वडील अरविंद जोशी (Arvind Joshi)  यांचे आज (29 जनेवारी) निधन झाले आहे. अरविंद जोशी 84 वर्षांचे होते. वयोमानानुसार जडलेल्या काही आजारपणामुळे त्यांच्यावर जुहू (Juhu) येथील नानावटी रूग्णालयात (Nanavati Hospital) उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अरविंद जोशी यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि पत्नी असा परिवार आहे. दरम्यान अरविंद जोशी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अरविंद जोशी हे नाव गुजराती रंगभूमीवरील मोठं व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये शोले, अपमान की आग, इत्तफा या सिनेमांमध्ये काम केले आहे.

परेश रावल यांचे ट्वीट

(नक्की वाचा: कन्नड अभिनेत्री Jayashree Ramaiah ची आत्महत्या; गेल्या कित्येक दिवसांपासून होती नैराश्यात).

अरविंद जोशी यांचा मुलगा शर्मन बॉलिवूडमध्ये मागील 2 दशकांपासून काम करत आहे. त्याचे अलग्न प्रेम चोप्रा यांच्या मुलीशी झालं आहे. तर मानसी ही त्यांची लेक अभिनेता रोहित रॉय सोबत विवाहबद्ध झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, अरविंद जोशी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif