Rekha Kamat Passes Away: अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी याने साकरलेल्या 'घना' च्या आजीची भूमिका देखील विशेष गाजली होती.

Rekha Kamat| PC: Instagram

मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा यांच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेल्या अभिनेत्री रेखा कामत (Rekha Kamat) यांनी आज (11 जानेवारी) अखेरचा श्वास घेतला आहे. रेखा कामत यांचं वृद्धापकाळाने मुंबईच्या माहिम मध्ये निधन झाले आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. मागील 60 वर्षांपासून रेखा कामत या विविध माध्यमातून रसिकांच्या भेटीला आल्या होत्या.

रेखा कामत या चित्रपट लेखक ग रा कामत यांच्या पत्नी होत्या. तर अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्या भगिनी होत्या. या दोन्ही सख्ख्या बहिणींनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपल्या कामाची छाप पाडली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रेखा कामत कलाविश्वापासून लांब झाल्या होत्या.

अभिनेत्री मनवा नाईकची पोस्ट

रेखा कामत यांची एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव या मराठी मालिका चांगल्याच गाजल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी याने साकरलेल्या 'घना' च्या आजीची भूमिका देखील विशेष गाजली होती. दरम्यान मालिकांप्रमाणेच अगं बाई अरेच्चा!, कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट या मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केले होते. ऋणानुबंध, संगीत एकच प्याला, गंध निशिगंधाचा, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा, प्रेमाच्या गावा जावे, मला काही सांगायचं आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र ही त्यांची मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटकं आहेत. हे देखील नक्की वाचा: Lata Mangeshkar In ICU: लता मंगेशकर Covid-19 संक्रमित; Breach Candy Hospital रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु .

रेखा कामत यांनी दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेतले होते. तर लहानपणापासून त्यांना गाणं आणि नृत्याची आवड होती. कथ्थक आणि भरतनाट्यमचे त्यांनी शिक्षण घेतले होते. भानुदास मानकामे व घोडके गुरुजींकडून गायनाचे धडे घेतल्याचं सांगण्यात येतं.