IPL Auction 2025 Live

Rajinikanth Health Update: 'रजनीकांत' चेन्नईमधील कावेरी रुग्णालयात दाखल

तसेच रजनीकांत यांचा अन्नाथे हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rajinikanth (Photo Credits: PTI)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना गुरुवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. चेन्नईमधील (Chennai) कावेरी रुग्णालयामध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे, दरम्याण रजनीकांत हे नियमीत आरोग्य तपासणीसाठी म्हणजेच रुटीन हेल्थ चेकअपसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना दाखल करुन घेण्यात आले. रजनीकांत यांचा अन्नाथे हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. (हे ही वाचा 67th National Film Awards Ceremony: दिल्लीत Rajinikanth यांचा आज Dadasaheb Phalke Award देऊन गौरव; पहा हा क्षण.)

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने समन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांनी राज बहादुर बस चालकाला समर्पित केला आहे. या बस चालकाने पहिल्यांदा रजनीकांत यांच्यातील कला आणि हुनर ओळखली होती. त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं होतं.

रजनीकांत यांनी १९७५ साली चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. के भालचंद्र यांच्या अपूर्वा रागंगल या चित्रपटामधून त्यांनी आपल्या कारर्किदीचा श्री गणेशा केला. रजनीकांत हे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये ४५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. ‘बिल्लू’, ‘मुथ्थू’, ‘बासाह’, ‘शिवाजी’, ‘इथीरान’ यासारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.