21 वर्षीय कन्नड टीव्ही अभिनेत्री Chethana Raj चा खाजगी रूग्णालयात प्लॅस्टिक सर्जरी दरम्यान मृत्यू

यामध्ये प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, अनुष्का शर्मा, शृती हसन आदींचा समावेश आहे.

Hospital | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कन्नड टीव्ही अभिनेत्री Chethana Raj ने वयाच्या 21व्या वर्षीय या जगाचा निरोप घेतला आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार प्लॅस्टिक सर्जरीच्या ऑपरेशन नंतर तिची प्रकृती ढासळली आणि त्यामध्ये या अभिनेत्रीचा करूण अंत झाला आहे. आजकाल सौंदर्यामधील अनेक दोष दूर करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. 21 वर्षीय Chethana Raj ला देखील त्याचीच भूरळ पडली आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये या ट्रीटमेंट नंतर तिचा मृत्यू झाला आहे.

ईटी टाईम्सच्या वृत्तानुसार, Chethana Raj 16 मे च्या सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिच्यावर 'फॅट फ्री'ची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर Chethana Raj च्या प्रकृती संध्याकाळी खालावली. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमायला सुरूवात झाली. यामध्येच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार, Chethana Raj या अभिनेत्रीने आपण अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेमधून जात असल्याचं आपल्या कुटुंबियांनाही कळवलेलं नव्हतं. मित्र मंडळींसोबत Chethana Raj हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. अभिनेत्रीच्या पालकांनी त्यांच्या लेकीच्या मृत्यूसाठी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं आहे.

पोस्ट मार्टम साठी Chethana चा मृतदेह आज सकाळी Ramaiah hospital मध्ये आणण्यात आला होता. सध्या पोलिसांत गुन्हा दाखल असून तिच्या मृत्यूचा तपास केला जाणार आहे.

बॉलिवूड मध्येही अनेक अभिनेत्रींनी प्लॅस्टिक सर्जरीची मदत घेत आपल्यामधील दोष दूर केले आहेत. यामध्ये प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, अनुष्का शर्मा, शृती हसन आदींचा समावेश आहे.