बाइक मधून 'या' कारणास्तव निघतो काळा धूर, लक्ष न दिल्यास होईल मोठे नुकसान

पण स्कूटर किंवा बाइक यांची देखभाल करण्याची अत्यावश्यक असते. काही बाइकच्या सायलेंसर मधून काळ्या रंगाचा धुर निघू शकतो.

Bike Black Smoke (Photo Credits-Facebook)

देशातील बहुतांश लोक एखाद्या ठिकाणी अगदीच लवकर पोहचायचे असेल तर दुचाकीचा वापर करताना दिसून येतात. पण स्कूटर किंवा बाइक यांची देखभाल करण्याची अत्यावश्यक असते. काही बाइकच्या सायलेंसर मधून काळ्या रंगाचा धुर निघू शकतो. परंतु लोक या गोष्टीवर लक्षच देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का जर बाइकच्या सायलेंरमधून धुर येत असल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. याच कारणास्तव तुमच्या बाइकचे इंजिन सीज सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला बाइक मधून काळ्या रंगाचा धूर येत असल्यास तुम्ही काय कराल.

तुमच्या मोटरसायकल मधून काळ्या रंगाचा धूर येत असल्यास समजून जा की, बाइकचे इंजिन ऑइल संपणार आहे. अशातच जर तुम्ही ऑइल बदलले नसल्यास इंजिन लवकरच खराब होऊ शकते. त्यामुळेच काळ्या रंगाचा धूर बाइक मधून खुप येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. काळा धूर बाइक स्टार्ट केल्याच्या नंतर निघतो.(कारचे इंजिन Overheat होत असल्यास त्यासाठी काय करावे, जाणून घ्या अधिक)

तसेच तुमच्या बाइकच्या स्कूटरमधून निघणाऱ्या काळ्या धुरापासून बचाव करण्यासाठी नवे इंजिन ऑइल हे जुन्या इंजिन सोबत मिक्स होऊ देऊ नका. नेहमीच जुने ऑइल निघाल्यानंतर त्यात नवे इंजिन ऑइल टाकावे. जर तुम्ही जुने आणि नवे इंजिन ऑइलचे मिश्रण बाइकमध्ये ठेवत असल्यास त्याचे इंजिन खराब होऊ शकते. या व्यतिरिक्त इंजिनच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमी उत्तम कंपनीच्या इंजिन ऑइलचा बाइकसाठी वापर करावा.(ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बूक सह वाहनांच्या कागदपत्रांची वैधता आता 31 मार्च 2021 पर्यंत ग्राह्य; Ministry of Road Transport & Highways ची माहिती)

तर काही लोक बाइक खरेदी तर करतात पण त्याची वेळोवेळी सर्विसिंग सुद्धा करणे विसरुन जातात. याच कारणामुळे बाइकचे इंजिन खराब होऊ शकते. त्यामुळे सर्विसिंगच्या वेळी ऑइल नक्की बदलून घ्या. असे केल्यास तुमची बाइक उत्तम राहिल. काही वेळेस मोटरसायकलचे पिस्टन खराब झाल्यानंतर बाइकच्या सायलेंसर मधून काळा धूर निघू शकतो. अशावेळी इंजिन बदला किंवा ते रिपेअर करुन घ्या.