टाटा मोटर्सची Tiago NRG भारतात लाँच, पाहा किंमत, फिचर्स

टाटा टियागो NRG ची मुंबईतील किंमत

Tata Tiago NRG

टाटा मोटर्सने आपली क्रॉस-ओव्हर कार टाटा टियागो NRG आज (बुधवार, १२ सप्टेंबर) लाँच केली. टियागोची वाढती लोकप्रियता पाहून कंपनीने नवी टियागो लाँच केली आहे. नवे तंत्रज्ञान आणि आकर्षक डिजाईन सोबत टियागोला टाटा मोटर्सने अगदीच नव्या अंदाजात सादर केले. नव्या टियागोला १.२ लीटर रेवोट्रोन पेट्रोल आणि १.५ रीटर रेवोट्रोन डीझेल इंजीन आहे. टाटाने टियागो एनआरजीमध्ये कॉस्मेटिक अपग्रेड्स आणि बरेच बदलही केले आहेत. या गाडीचा ग्राऊंड क्लियरन्स १८० एमएम आहे.

टियागो NRGस्पीड मॅन्यूअल टान्समिशनसोबत उपलब्ध आहे. कंपनीने कारच्या इंटेरियरवरही चांगले ध्यान दिले आहे. टियागो NRG इन्फीनिटी काळ्या रंगात, आकर्षक ग्लोव बॉक्स, शानदार सीटमध्ये उपलब्ध आहे. टाटा टियागो NRG जुन्या मॉडेलपेक्षा अधिक लांब आणि रूंदही आहे. टियागो NRGमध्ये हर्मनचे टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टमही आहे.

मुंबईत नव्या टियागोची (पेट्रोल व्हर्जन) किंमत ५५३९९५ रूपये तर, डिझेल मध्ये हिच गाडी ६३८९९५ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. तर, दिल्लीतमध्ये नवी टियागो NRG पेट्रोल गाडी ५४९९९५ रूपयांना आणि डिझेल गाडी ६३१९९५ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून

Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत राज्य सरकार देणार 10 टक्के सवलत; सर्व चारचाकी प्रवासी इ-गाड्यांना 'या' महामार्गांवर टोल माफ, जाणून घ्या सविस्तर

Advertisement

Tesla Cybertruck in India: सुरतमधील व्यावसायिक Lavjii Badshah ठरले टेस्ला सायबरट्रक आयात करणारे पहिले भारतीय; चर्चांना उधाण, जाणून घ्या फीचर्स व किंमत (Video)

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement