Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिकने आपल्या नवीन दर्जेदार ई-स्कूटरचे सुरू केले बुकिंग, जाणून घ्या कसे कराल प्री-बुकिंग

ई-स्कूटर ओला इलेक्ट्रिकची वेबसाइटवर रक्कम फक्त 499 रुपये आरक्षित करण्यासाठीस ठेवणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

ओला इलेक्ट्रिकने(Ola Electric) गुरुवारी आपल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी (E Scooter) बुकिंग सुरू केले आहे.  ई-स्कूटर ओला इलेक्ट्रिकची वेबसाइटवर रक्कम फक्त 499 रुपये आरक्षित करण्यासाठीस ठेवणार आहे. ओलाचे उद्दीष्ट ई-स्कूटरला(E Scooter) लीप-फ्रॉग उत्पादन म्हणून स्थापित करणे आहे. जे मोटर, बॅटरी, वाहन संगणक आणि इतर अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह अनेक उद्योगातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसह येते. स्कूटरला होम चार्जर(Home Charger) मिळेल अशी अपेक्षा आहे. ज्यास एका विशिष्ठ ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ असा की ग्राहक नियमित वॉल सॉकेटवर प्लग इन करुन घरी ई-स्कूटर चार्ज करू शकतील.

अलीकडेच ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी स्कूटरच्या ड्राइव्ह कामगिरीची चाचणी करण्याचा त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्कूटर काही सेकंदात 0-60 किमी वेग वाढवते. असा दावा त्यांना केला आहे. तसेच सर्वात जास्त ग्राहक या स्कूटरला लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.. बहुप्रतिक्षेत असलेली ई-स्कूटरची नावे आणि वैशिष्ट्ये लॉन्च झाल्यावर घोषित केली जातील असे त्यांनी सांगितले. याशिवाय कंपनीने जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूमधील 500 एकर क्षेत्रात कंपनीने कारखाना सुरु केला आहे. या कारखान्यात लवकरच ई-स्कूटर उत्पादन सुरू करणार आहे. सध्या कंपना 2 दशलक्ष स्कूटरचे उत्पादन करत आहे. मात्र पुढील दहा वर्षात हेच उत्पादन वाढवून 10 दशलक्ष करणार असल्याचे सांगितले आहे.

 

ई-स्कूटर ईटरगो बीव्हीच्या (Etergo BV) स्कूटरनंतर हे मॉडेल तयार केले गेले आहे. इटर्गो बीव्ही या स्कूटरपासून कंपनीची सुरूवात होती. ज्याला मागील २०२० मध्ये ओला कंपनीने विकत घेतला होता. ई-स्कूटरला यावर्षी जुलैमध्ये बाजारात विक्रीसाठी आणण्याचा कंपनीचा पुर्ण विचार असेल. जुलै महिन्याच्या अखेरीस ही स्कूटर रस्त्यावर आपले वर्चस्व निर्माण करेल अशी अपेक्षा कंपनीकडून केली जात आहे.

या स्कूटरमध्ये वैशिष्ठ्ये काय असणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. यात किफायतशीर किंमतीसह चांगल्या प्रकारचा बॅटरी क्षमता असेल. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइनमुळे ही स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस पडेल. यासाठी इच्छुक खरेदीदारांनी ओला स्कूटर कंपनीच्या olaelectric.com  वेबसाइटवर जाऊन आपली स्कूटर बुक करू शकतात. यासाठी 499 रुपये इतके शुल्क आकारले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif