Gudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट

गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कारवर उपलब्ध असलेल्या विशेष डिस्काऊंट आणि ऑफर्सचा नक्की लाभ घ्या.

Gudi Padwa 2019 Offers on Cars (Photo Credits: File Photo)

गुढी पाडवा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणाचा उत्साह, नववर्षाचं स्वागत याचा जल्लोष तर असेलच. पण या सणानिमित्त नवीन घर, कार, वस्तू खरेदी करण्याचेही खूप आकर्षक असते. तुम्ही देखील गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कारवर उपलब्ध असलेल्या विशेष डिस्काऊंट आणि ऑफर्सचा नक्की लाभ घ्या. गुढीपाडव्या निमित्त होंडा अॅक्टीव्हा 5G, सुझुकी गिक्स्कर, यामहा R15 V3 यांच्यासह 'या' बाईक्सवरही मिळवा 7000 रुपयांपर्यंत सूट

कार्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स:

मारुती इर्टिका: इंडो-जपानी कार निर्मितीची मारूती सुझुकी इर्टिका ही लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. गुढीपाडव्या निमित्त या कारवर दोन्ही वेरिएंट्सवर (पेट्रोल-डिझेल) 20000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. या कारच्या एक्स्चेंज ऑफर देखील जबरदस्त सूट मिळत आहे. कार 7 वर्षांपेक्षा कमी जूनी असल्यास याच्या डिझेल-पेट्रोल वेरिएंटवर अनुक्रमे 45,000 आणि 30,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल.

मारुती अल्टोः मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार - अल्टो 800 आणि अल्टो के 10 यावर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अल्टो 800 आणि अल्टो के 10 वर अनुक्रमे 25,000 रुपये आणि 17,000 रुपये डिस्काऊंट मिळेल. 7 वर्षांपेक्षा कमी जून्या असलेल्या कार्सवर अनुक्रमे 25,000 आणि 30,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस दिले जातील.

टाटा टिगोर: टाटा मोटर्सची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडानवर गुढी पाडव्या निमित्त आकर्षक ऑफर आणि डिस्काऊंट दिले जात आहे. काही डिलर्स पूर्ण वर्षभराचा विमा 10.000 रुपयांना देत आहेत आणि त्यासोबतच 10000 रुपयांचा एक्स्चेंज बोनसही दिला जात आहे. ही ऑफर डिलर्सनुसार बदलू शकते. याव्यतिरिक्त, टाटा हेक्सा विकत घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहक 10,000 वर्षांचे एक्सचेंज बेनिफिट घेऊ शकतात. तसंच पहिल्या वर्षाच्या विमासह फक्त 25,000 रुपयांत उपलब्ध होईल.

होंडा सिटी: होंडा कार इंडियाचे मिड-सेडान- गुढी पाडव्या निमित्त खास ऑफर्स आणि आकर्षक डिस्काऊंटसह होंडा सिटी कार खरेदी करता येईल. अनेक डिलर्स व्हीएमटी व्हेरिएंट वगळता होंडा सिटी कारवर पहिल्या वर्षाचा होंडा अॅश्युर विमा देत आहेत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा: टोयोटाची लोकप्रिय एमपीव्ही वर देखील गुढी पाडव्या निमित्त दरम्यान आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. नवीन इनोव्हा क्रिस्टा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कमी व्याज वित्त योजनेसह 5000 रुपये किंमतीची अॅक्सेसरीज मिळण्याची संधी आहे. टोयोटा कोरोला अल्टीस वर देखील आकर्षक ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 80,000 रुपयांपर्यंतचे लाभ, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह मिळतील.

हुंडाई ग्रँड आय 10: हुंडाई ग्रँड आय 10 वर आकर्षक सवलत मिळत आहे. ज्यामध्ये खरेदीदारांना 35,000 रुपये डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस 35,000 रुपये मिळेल. त्याचबरोबर सरकारी कर्मचा-यांना रोख सवलत मिळेल. मात्र हे डिस्काऊंट्स डिलर्सनुसार बदलतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now